दरम्यान, उपसरपंच पदासाठी दिगंबर चंद्रकांत लोणारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव बारणे व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी दिगंबर लोणारी यांची बिनविरोध निवड घोषित केली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर मुंगसे, हनुमंत कुटे, गणेश दळवी, श्रीपाद लोणारी, आण्णासाहेब लोणारी, जालिंदर कुटे, सयाजी गांडेकर, गणेश कुटे, मुचकुंद जाधव, नवनाथ गांडेकर, अशोक पिंगळे, संतोष लोणारी, कैलास पिंगळे, नाना गांडेकर, गजानन गांडेकर, गुरुदास लोणारी, महेश गुंडगळ, ग्रामपंचायत सदस्य विश्वास गांडेकर, विजय काळे, चंद्रकांत गांडेकर, प्रतीत ओव्हाळ, पूजा गुंडगळ, मीनाक्षी लोणारी, रंजना पठारे, लंकाबाई कुटे, रोहिणी पिंगळे, शीतल कुटे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच दिगंबर लोणारी यांचा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदाच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच दिगंबर लोणारी यांनी सांगितले.
दिगंबर लोणारी यांचा सत्कार करताना मान्यवर.