शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

By admin | Published: September 07, 2015 4:14 AM

पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस,

आळंदी : पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चोविसावीवाडी, चऱ्होली, काटेवस्ती, देहू फाटा व आळंदी येथील दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली बीआरटी सेवा पुणेकरांसाठी सोईची वाटत असली तरी पुणे शहराच्या विविध भागांतून आळंदीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. टप्प्याटप्प्याने उतरणाऱ्या विद्यार्थी व वृद्धांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असल्यामुळे विद्यार्थी, त्यांचे पालक व वृद्धांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत असून या व इतर प्रवाशांसह आळंदीकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा प्रवास नकोसा वाटत आहे. बीआरटीची सेवा सुरू झाल्यापासून पुणे ते आळंदी मार्गावर ठिकठिकाणच्या टप्प्यावरील चढ-उताराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएलने चक्क वाऱ्यावर सोडून दिले असून आळंदी, चऱ्होली, चोविसावीवाडी, वडमुखवाडी, म्याग्झीन चौक, दिघी येथील दत्तनगर, परांडेनगर, गायकवाडनगर, विठ्ठल-रुक्मिणी चौक, जकात नाका या परिसरातील उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आळंदी पंचक्रोशीतील सोळू, मरकळ, धानोरी, चऱ्होली, वडगाव, केळगाव व अन्य भागांतील प्रवासी आळंदी थांब्यावर येऊनच येथून पुढील प्रवास करतात. पुणे-आळंदी मार्गावरील या प्रवाशांना पुण्याहून येताना कोणत्याही गाडीत बसले तर विश्रांतवाडी येथे इच्छा नसली तरी उतरावे लागते, मग इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागते. या एकूण प्रवाशांपैकी कोणी विश्रांतवाडी चौकात उतरते, कोणी कळसला उतरते, कोणी दिघीला तर कोणी अन्य ठिकाणी. या एकूण प्रवासात लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, लहान मुली, मोठ्या मुली, कामगार महिला, नोकरदार महिला, मजूरवर्ग, पाठीवर, खांद्यावर ओझ्याचे बोचके घेऊन प्रवास करणारे लहान, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष यांच्यासाठी हा प्रवास खरोखर जीवघेणा ठरू पाहत आहे. स्वारगेट, पुणे स्थानक, म. न. पा. व हडपसर येथून येताना होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात पुन्हा मध्येच विश्रांतवाडी येथे उतरावे लागत असल्यामुळे व परतीच्या प्रवासात तर त्याहून वाईट अनुभव घ्यावा लागत असल्यामुळे आळंदीकडे येताना व जाताना प्रवासी त्रस्त आहेत.(वार्ताहर)