असुविधांचा पाढा, प्रशासन धारेवर; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून तीव्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:49 AM2018-08-24T04:49:42+5:302018-08-24T04:50:02+5:30

महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील कामे होत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.

Disagreements, administration; Emotion of the members in the General Meeting of the municipal corporation | असुविधांचा पाढा, प्रशासन धारेवर; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून तीव्र भावना

असुविधांचा पाढा, प्रशासन धारेवर; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून तीव्र भावना

Next

पुणे : शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडलाय, भर पावसाळ्यात अनेक भागाला आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही, रस्त्यांची चाळण झाली, ड्रेनेजची कामे होत नाहीत, शाळांची दुरवस्था झाली, ढासळलेली आरोग्य सेवा आदी प्रश्नांचा पाढांच सदस्यांनी वाचला. अधिकारी नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, लेखी अर्जांना उत्तर दिले जात नाही, सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही, असे सांगत गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील कामे होत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.
महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सभेची सुरुवातीलाच पॉइंट आॅफ इन्फॉर्मेशनमध्ये काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ई-बसेस खरेदीचा निर्णय महापालिका आयुक्त कसे जाहीर करतात,
हा महापौर आणि सभागृहाचा अवमान आहे.
महापालिकेच्या बोगस कारभारामुळे विजेचा झटका लागून एका मुलाचा जीव जातो तरी प्रशासन जागे होत नाही, शहराच्या कानाकोपºयातून आपल्या भागातील प्रश्न घेऊन सदस्य अधिकाºयांकडे जातात, पण अधिकारी कार्यालयात भेटतच नाहीत, असा आरोप करत खुलासा करण्याची मागणी करत चर्चा सुरू केली. त्यानंतर सत्ताधारी भाजपाचे सदस्य सुशील मेंगडे, कर्णे गुरुजी, माधुरी सहस्रबुद्धे, मंजूषा खर्डेकर, छाया मारणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी सत्ताधारी सदस्यासह संजय भोसले, अविनाश बागवे, बाळा ओत्सवाल, योगेश ससाणे, गफुर पठाण आदी विरोधी सदस्यांनी एलईडी दिवे, वाहतूक, खड्डे, पाणी पुरवठा, आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली.
सत्ताधारी सदस्यांकडून हतबलता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून या परिस्थितीला भाजपाचे पदाधिकारीच जबाबदार असल्याचे सांगत सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याचे सांगितले. बहुमतामुळे सत्ताधारी विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, प्रश्न-उत्तराचा तास घेतला जात नाही, यामुळे प्रशासनावर दबाव राहत नसल्याचा आरोप अविनाश बागवे यांनी केला.

अधिकाºयांची चुगली पडली प्रशासनालाच महागात
सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व अधिकाºयांनी सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे द्या. यासाठी घाबरायचे कारण नाही, अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. परंतु, बैठक झाल्यानंतर एका अधिकाºयाने ही बाब सत्ताधारी भाजपाच्या एका पदाधिकाºयाच्या कानात सांगितली. पदाधिकाºयांचे यापुढे आयुक्त ऐकणार नसल्याचेदेखील सांगितले अन् इथेच माशी शिंकली आणि सर्वसाधारण सभेत आयुक्त आणि अधिकाºयांना धारेवर धरण्याची रणनीती आखली गेल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात होती.

महापालिकेचे हित लक्षात घेऊनच काम
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर जोरदार टीका झाल्यानंतर खुलासा करताना महापौर सौरभ राव यांनी थोडे भावनिक होत आपण अत्यंत लो प्रोफाईल अधिकारी असून, महापालिकेचे हित लक्षात घेऊनच व कायद्यात बसणारीच कामे करणार असल्याचे स्पष्ट केले.
सध्या अधिकारी, कर्मचाºयांची कमतरता असल्याने अनेक अडचणी येत असून, शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर रिक्त भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. तसेच शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली.

Web Title: Disagreements, administration; Emotion of the members in the General Meeting of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.