केंद्र सरकार दडपशाहीचे ; पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांमध्ये विसंगती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:07 PM2020-01-20T16:07:02+5:302020-01-20T16:10:20+5:30

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून केंद्र सरकारचे समर्थन आणि टीकेचे सत्र सुरु आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली असून या कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विसंगती असल्याचा आरोप केला आहे.

Discrepancies between PM and Home Ministers regarding NRC ; Supriya Sule | केंद्र सरकार दडपशाहीचे ; पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांमध्ये विसंगती 

केंद्र सरकार दडपशाहीचे ; पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांमध्ये विसंगती 

Next

पुणे :नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून केंद्र सरकारचे समर्थन आणि टीकेचे सत्र सुरु आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली असून या कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विसंगती असल्याचा आरोप केला आहे. या सरकारकडे फक्त आऊटगोइंग असून इनकमिंग म्हणजे ऐकून घेण्याची पद्धत नाही अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी पुणे महापालिकेत विविध अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या की, 'एनआरसीच्या मुद्द्यावर केंद्रसरकार असंवेनशील सरकार आहे. त्यांचे सगळे आऊट गोइंग असते. त्यांचे इनकमिंग काहीही नसते. कोणाचे काही ऐकण्याची पद्धत या सरकारकडे नाही. सध्याचे सरकार दडपशाहीचे आहे.त्यांच्यात विसंगती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एनआरसीवर कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत देशात एनआरसी करेन असे सांगितले. या दोन मोठ्या पदावरील व्यक्तींच्या बोलण्यातच अंतर आहे, त्यामुळे नागरिकांच्या मनात अधिक अस्वस्थता आहे. पंतप्रधान एक गोष्ट म्हणतात आणि गृहमंत्री दुसरी गोष्ट सांगत आहेत. इतक्या मोठ्या निर्णयाबाबत देशाच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये अंतर असेल तर अतिशय चिंताजनक बाब आहे असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. 

यावेळी त्यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीबाबत सांगितलेल्या माहितीचे मुद्दे खालीलप्रमाणे :

  • तृतीयपंथी घटकांसाठी विशेष कल्याणकारी मंडळ स्थापन करणार. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक झाली असून पुढील २१ दिवसात होणार अंमलबजावणी. 

 

  • सरकारमध्ये पूर्ण समन्वय आहे,रोज नवनवे निर्णय घेतले जात आहेत. 

 

  • ग. दि, माडगूळकर स्मारकासाठी एकनाथ शिंदेंकडे बैठक संपन्न. त्यांची जन्मशताब्दी असल्याने याच वर्षी स्मारक करण्याचा विचार. 

 

  • सिंहगड ते हडपसर या ४५ किलोमीटरच्या सायकलमार्गावर चर्चा. जयंत पाटील यांच्यासोबत लवकरच घेणार बैठक 

Web Title: Discrepancies between PM and Home Ministers regarding NRC ; Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.