पुणे शहराध्यक्षपदाची बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:16 AM2018-04-30T04:16:29+5:302018-04-30T04:16:29+5:30

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवार (दि. २९) पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या

Discussion in Pune City President's post | पुणे शहराध्यक्षपदाची बैठकीत चर्चा

पुणे शहराध्यक्षपदाची बैठकीत चर्चा

Next

पुणे : महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवार (दि. २९) पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये पुणे शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा होती. परंतु शहराध्यक्षासह अन्य सर्व पदांच्या निवडी येत्या आठ-दहा दिवसांत करण्यात येतील. पदाधिकारी निवडीचे सर्व अधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्याचा ठरावदेखील बैठकीत करण्यात आला. दरम्यान, पुणे शहर अध्यक्षपदासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर व माजी महापौर प्रशांत जगताप यांची नावे आघाडीवर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते बैठकीसाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसच्या विद्यमान पुणे शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण यांचा कार्यकाळदेखील पूर्ण झाला आहे. यामुळे गेल्या एक-दोन महिन्यांपासून पुणे शहराध्यक्ष बदलाची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष निवडीचे अधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीत २९ एप्रिलच्या बैठकीत नवीन शहराध्यक्षांचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. यामुळे अध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. परंतु आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पक्ष संघटना मजबूत करताना गेले दहा-दहा वर्षे विविध पदे भूषविणाऱ्यांनी आता स्वत:हून थोडे बाजूला व्हावे व नवीन चेहºयांना, तरुणांना संधी द्यावी, असा संदेशच अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान आपल्या भाषणात दिला. पक्षसंघटनेसाठी खºया अर्थाने काम करणाºया नवीन लोकांना संधी देण्याची गरज आहे. यामध्ये कार्यकारिणीची संख्या वाढली तरी चालेल, परंतु केवळ नावापुरते पदाधिकारी नेमू नयेत, अशीदेखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Discussion in Pune City President's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.