काम न केल्यास इंटकची शाखा बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:22+5:302021-01-10T04:09:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “काम करा, अन्यथा तुमची शाखा बरखास्त करण्यात येईल,” अशी तंबी इंटकचे राज्य अध्यक्ष माजी ...

Dismissal of Intac branch if not working | काम न केल्यास इंटकची शाखा बरखास्त

काम न केल्यास इंटकची शाखा बरखास्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “काम करा, अन्यथा तुमची शाखा बरखास्त करण्यात येईल,” अशी तंबी इंटकचे राज्य अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना दिली आहे. इंटक ही काँग्रेसप्रणीत देशातील एकेकाळची बलाढ्य कामगार संघटना आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांच्या विरोधात इंटकच्या वतीने जानेवारीत विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट अध्यक्षांनीच पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची खंत त्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

छाजेड यांनी पत्रात म्हटले आहे की, जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील इंटक संलग्न कामगार संघटनांचे एकत्रीकरण करणे, त्यांना शक्ती देणे, नव्याने कामगार संघटना रजिस्टर करणे ही कामे करणे अपेक्षित आहेत. यातील कोणतीच अपेक्षा पूर्ण होत नाही असे दिसते. त्यामुळे इंटकची जिल्हास्तरावर पुनर्रचना करावी लागणार असे दिसते.

जानेवारीत इंटकच्या वतीने मुंबईत राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी त्वरित नियोजन सुरू करावे. जास्तीतजास्त कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना छाजेड यांनी केली आहे. याप्रमाणे काम झाले नाही तर जिल्हा शाखा बरखास्त करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Dismissal of Intac branch if not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.