जिवंत माणसं एकत्र असतात तेव्हा वाद होतातच: पुणे महापालिकेतील वादावर चंद्रकांत पाटलांचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 01:58 PM2021-06-03T13:58:23+5:302021-06-03T14:25:43+5:30
तोडगा निघाला नाही तर चिंता : पाटील
पुणे: जिवंत माणसं एकत्र असतात तेव्हा वाद होणं यात काही वेगळं नाही असं म्हणत भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचा वादावर तोडगा काढला जात असल्याचे संकेत दिले आहेत. थेट त्यांचा पातळीवरून या संपूर्ण प्रकरणात लक्ष घातलं गेल्याचे आहे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यामध्ये काल महापालिकेत वाद झाला. पीएमपी च्या अध्यक्षपदावरून शंकर पवार यांचा राजीनामा घेण्यात आला होता.तो राजीनामा तांत्रिक कारण पुढे करत नाकारण्यात आला होता. महापौरांकडे हा राजीनामा सादर केल्याने तो नाकारला गेला आणि पुन्हा एकदा हा राजीनामा घेण्याची वेळ आली होती. या प्रकरणावरून महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांचा मध्ये वाद झाला. अँटी चेंबर मध्ये झालेल्या वादाचा आवाज वाढल्याने त्या मजल्यावर आजूबाजूला पण ऐकू आला.
निवडणूक वर्षावर आली असताना पदाधिकाऱ्यांमध्ये होणारे वाद थेट चव्हट्यावर आले आहेत. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले,
"जिवंत माणसं जेव्हा एकत्र असतात तेव्हा अशा काही गोष्टी घडणं यात फार काही वेगळे मानलं पाहिजे असं नाही.घडणाऱ्या गोष्टींमधून तातडीने भेटीगाठी घडून त्यातून उत्तर काढणं हे होत नसेल तर त्यात चिंता असते. भारतीय जनता पार्टी मध्ये लुब्रीकंट ही एक रचना आहे."