विसर्जनादिवशीचे वाहतूक नियोजन

By admin | Published: September 26, 2015 02:41 AM2015-09-26T02:41:58+5:302015-09-26T02:41:58+5:30

लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांनी बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाताना लक्ष्मी रस्त्याच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गाचा व दगडूशेठ गणपती दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी सेवासदन चौक

Dissociation Transportation Planning | विसर्जनादिवशीचे वाहतूक नियोजन

विसर्जनादिवशीचे वाहतूक नियोजन

Next

पुणे : लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांनी बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाताना लक्ष्मी रस्त्याच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गाचा व दगडूशेठ गणपती दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी सेवासदन चौक, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक मार्गे दर्शन घेऊन बेलबाग चौकाकडे जायचे असल्यास पासोड्या विठोबा, सोन्या मारुती चौक,
केंजळे चौकाकडून बेलबाग चौकाकडे जावे.
सातारा रस्त्याकडून येणारी वाहने शंकरशेठ रस्ता, गोळीबार मैदान चौक, भैरोबानाला चौक, सर्किट हाऊसमार्गे नगर रस्त्याने जातील तसेच नगर रस्त्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने उलट दिशेने जातील. साताऱ्याकडून मुंबईकडे व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने एक्स्प्रेस-वे नेच जातील.
एकेरी मार्ग : (सकाळी ९ ते
मिरवणूक संपेपर्यंत)
१. शिवाजी रस्ता / लक्ष्मी रस्ता : गाडगीळ पुतळा चौक ते जिजामाता चौक, गणेश रस्त्याने फडके चौक, मोती चौक सरळ सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, सेवासदन चौक, सरळ लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचाऱ्यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (टिळक चौक बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी)
२. नकलाकार भोंडे पथ : अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक - मोती चौकाकडे जाण्यासाठी पादचाऱ्यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. (मोती चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे येण्यास बंदी)
३. रामेश्वर चौक ते शनिपार चौक : रामेश्वर चौकाकडून शनिपार चौकाकडे फक्त जाण्यासाठी पादचाऱ्यांकरिता एकेरी करण्यात येत आहे. टिळक, बाजीराव, कुमठेकर आणि केळकर रस्ता हे मार्ग पादचाऱ्यांसाठी दुहेरी केले आहेत.
मिरवणुकीच्या वेळी बंद करण्यात येणारे रस्ते : शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक.
लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते टिळक चौक - सकाळी ७ ते मिरवणूक संपेपर्यंत.
बगाडे रस्ता : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक - सकाळी ९ ते मिरवणूक संपेपर्यंत.
बाजीराव रस्ता : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक - दुपारी २ ते मिरवणूक संपेपर्यंत.
कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक - दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत.
गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक - सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत.
भोंडे / केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक - सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत.
टिळक रस्ता : जेधे चौक ते अलका टॉकीज चौक. शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक - दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत.
जंगलीमहाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)
कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)
फर्ग्युसन रस्ता : फर्ग्युसन कॉलेज गेट ते खंडोजी बाबा चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार)
भांडारकर रस्ता : पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक - दुपारी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत (आवश्यकतेनुसार).

Web Title: Dissociation Transportation Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.