गळीतधान्य व तेलताड अभियानाअंतर्गत निरावागज येथील चैतन्य शेतकरी बचत गट, शरद सेंद्रिय शेतकरी बचत गट व वाघेश्वरी शेतकरी बचत गट यांनी कृषी विभागाच्या महाडीटीबी पोर्टलवर बियाणे वितरण अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरलेले होते. त्याप्रमाणे त्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाल्याने वरील गटांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.
बियाणे वाटपावेळी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीटीबी पोर्टलवर वेळच्या वेळी वेगवेगळ्या योजनेकरिता अर्ज भरून लाभ घेण्याचे व सोयाबीन उगवणीकरिता पुरेशी ओल आल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन देवकाते यांनी केले. या कार्यक्रमासाठी नामदेव मदने, ज्ञानदेव देवकाते, हरिश्चंद्र धायगुडे, शीतल धायगुडे, ग्रामपंचायत सदस्या व वरील गटातील सदस्य शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ यांनी मार्गदर्शन केले.
निरावागज येथे सोयाबीन बियाणांचे वाटप करताना विश्वास देवकाते.
१००६२०२१-बारामती-०२