छत्रपती कारखान्यात ऊतिसंवर्धित ऊसरोपांचे सभासदांना वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:08+5:302021-07-21T04:09:08+5:30

कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या सूचनेनुसार सभासदांचे उसाचे एकरी उत्पादन वाढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी ...

Distribution of tissue culture plants to members at Chhatrapati factory | छत्रपती कारखान्यात ऊतिसंवर्धित ऊसरोपांचे सभासदांना वितरण

छत्रपती कारखान्यात ऊतिसंवर्धित ऊसरोपांचे सभासदांना वितरण

googlenewsNext

कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या सूचनेनुसार सभासदांचे उसाचे एकरी उत्पादन वाढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथून कारखान्याने मागावलेली रोगमुक्त उसाची रोपे वितरित करण्यात आली शेतकऱ्यांनी रोगमुक्त बियाण्याची निवड करणे गरजेचे आहे. ऊतिसंवर्धित उसाच्या रोपांपासून रोग मुक्त बेणे मळा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही रोपे लावावीत व आपले उत्पन्न वाढविण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी केले. यावेळी कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक अशोक मोरे ,मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे ,अकाउंट आॅफिसर हनुमंत करवर, ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे, सुपरवायझर महेश काटे, अरुण लोधाडे, स्वप्निल गावडे, विनायक कदम यांच्यासह अधिकारी व सभासद उपस्थित होते.

---------------------------------

फोटो ओळी : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना उतिसंवर्धित रोपांची सभासदांच्या मागणीप्रमाणे वितरण करण्यात आले.

२००७२०२१-बारामती-१२

-------------------------------

Web Title: Distribution of tissue culture plants to members at Chhatrapati factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.