जिल्हा होणार क्षयरोग, कुष्टरोग मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:10 AM2020-11-28T04:10:41+5:302020-11-28T04:10:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरन कार्यक्रमा अंतर्गत पुणे जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्टरोग्यांची तपासणी मोहिम ...

The district will be free from tuberculosis and leprosy | जिल्हा होणार क्षयरोग, कुष्टरोग मुक्त

जिल्हा होणार क्षयरोग, कुष्टरोग मुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरन कार्यक्रमा अंतर्गत पुणे जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्टरोग्यांची तपासणी मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतगर्गत त्यांना मोफत उपचार दिले जाणार आहे. या माध्यमातून जिल्हा क्षयरोग तसेच कुष्टरोग मुक्त करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्टरोग्यांची संख्या जास्त आहे. मे २०२० अखेर जिल्ह्यात ४ हजार १४० रूग्ग्ण हे शासकिय तर ५५४ रूग्ग्ण हे खाजगी रूग्ग्णालयात उपचार घेत आहेत. यातील ७७ एमडीआर रूग्ग्ण उपचार घेत आहे. आतापयर्यंत ११ रूग्ग्णांचा मृत्यू या आजाराने घेतला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील क्षयरोग आणि कुष्टरोग्यांना उपचार मिळण्यास अडचणी आल्या. यामुळे जिल्ह्यातील या रूग्ग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी राष्टीय दुरिकरण कार्यक्रमाअंतर्गत टीबी होरगा देश जितेगा उपक्रमाअंतर्गत आणि जिल्हा क्षयरोग आणि कुष्टरोग मुक्त करण्यासाठी ही मोहिम राबविली जाणार आहे.

१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आशा सेविकांमाफर्फत तसेच प्रशिक्षित अधीकारी कमर्मचारी यांच्या माफर्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

चौकट

मोहिमेचे उद्दीष्ट

कोरोनामुळे गेल्या ८ महिन्यांपासून क्षयरूग्ग्ण निदानाअभावी वंचित असणाऱ्या क्षयरूग्ग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे. यासाठी गृहभेटी करणे. क्षयरोग आणि कुष्टरोगाची लक्षणे असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या घेऊन उपचार करणे. तसेच समाजामध्ये या आजाराबाबत जागृती करणे.

चौकट

शासन करणार खर्च

या मोहिमेअंतर्गत उचचार सुरू असणाऱ्या रूग्ग्णांचा खर्च शासन करणार आहे. उपचार संपेपयर्यंत त्यांना ५०० रूपये दरमाहा दिले जाणार आहे. हे अनुदान डीबीटी योजनेमाफर्फत रूग्ग्णांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. आतापर्यंत ५ कोटी ८ लाख १५ हजार रूपये अनुदानापोटी वाटप करण्यात आले आहे.

कोट

जिल्हा क्षयरोग, कुष्टरोगमुक्त करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी कुठलीही माहिती न लपवता सहकार्य करावे.

-आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी.

Web Title: The district will be free from tuberculosis and leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.