जागो नही, भागो ग्राहक भागो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 12:39 AM2018-08-05T00:39:32+5:302018-08-05T00:51:17+5:30

सेवा पुरविणाऱ्यांकडून होणार ग्राहकांचे शोषण थांबावे आणि फसवणूक झाल्याप्रकरणातून न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास सरसावत आहे.

Do not wake up, run away the customer | जागो नही, भागो ग्राहक भागो

जागो नही, भागो ग्राहक भागो

Next

पुणे : सेवा पुरविणाऱ्यांकडून होणार ग्राहकांचे शोषण थांबावे आणि फसवणूक झाल्याप्रकरणातून न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास सरसावत आहे. मात्र मंचातील सुनावणीसाठी तक्रारदार गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. तक्रारदार सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रलंबित खटले मंचाकडून निकालात काढण्यात येत आहे.
पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात गेल्या तीन महिन्यांत ८४ खटले निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे तब्बल ४४ खटले तक्रारदारांनी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने निकालात काढण्यात आले आहेत. त्यातील ६ प्रकरणांत तर तक्रारदार आणि ज्या सेवा पुरवठादाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तो देखील सातत्याने गैरहजर राहत असल्याने खटला निकाली लागला आहे. ८४ पैकी ९ खटले तक्रार मागे घेतल्याने निकाली निघाले आहेत. त
काही खटल्यांत तक्रारदाराकडे पुरेसे पुरावे नसल्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी सुरू असताना आपला दावा टिकणार नाही याची चाहूल तक्रारदाराला लागते. त्यामुळे ते सुनावणीला हजरच राहत नाही. १९८५ मध्ये संपूर्ण राज्यात ग्राहक मंच सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील नागरिकांना न्याय मागण्यासाठी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाची येथे स्थापना करण्यात आली आहे. या ग्राहक मंचात ग्राहकांच्या न्यायासाठी सुनावणी होत असते. वस्तुस्थिती लक्षात घेऊन फसवणूक झाल्या प्रकरणात ग्राहकांना मोबदला, त्यावरचे व्याज ग्राहक मंचात मिळवून दिला जातो. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक त्रास, तक्रार अर्जाचा खर्चही ग्राहक मंच ग्राहकाला मिळवून देत असतो. अलीकडच्या काळात ग्राहक हक्काबाबत जागृत होत आहे. फसवणूक झाल्यास तो ग्राहक मंचात दाद मागत असतो. ग्राहकांनी मंचात दाद मागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याबरोबरच दाखल केलेल्या तक्रारदारांनीच दाव्यात गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
>...या कारणांमुळे तक्रारदार राहताहेत गैरहजर
तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या जाब देणाºयांमध्ये आणि तक्रारदारांमध्ये समझोता होतो. अपेक्षित मोबदला मिळाला की तक्रारदार समाधानी होऊन खटल्याकडे दुर्लक्ष करतो.
मात्र, याबाबतची माहिती पक्षकारांकडून मंचात देण्यात येत नाही. त्यामुळे तक्रारदार, जाब देणार दोघेही गैरहजर राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे तक्रारदार हजर राहू शकत नाहीत.
खटला पुण्यात दाखल झाला असेल तक्रारदार परदेशात किंवा दुसºया राज्यात राहण्यासाठी गेला असले तर त्याला सुनावणीला हजर राहणे शक्य होत नाही. तसेच विषयाची आर्थिक किंमत आणि त्यासाठी लागणाºया वेळेचा विचार करून काही तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात.
>लवकर तारीख मिळावी
खटल्यांचे प्रमाण वाढल्याने प्रकरणाच्या सुनावणीसाठी मोठ्या कालावधीनंतर तारीख दिली जाते. तीनपेक्षा अधिक महिन्यांच्या कालावधीची तारीख मिळाली तर प्रकरण लांबते. त्यामुळे ग्राहकाला त्वरित न्याय मिळत नाही.
दाखल केल्यापासून एक वर्षात निकाल लागणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुढील तारीख मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरेजेचे आहे, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप केंजळकर यांनी केली आहे.
>अनेकवेळा बाहेरच
प्रकरण मिटवले जाते
तक्रारदार गैरहजर राहण्यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे सुनावणीसाठी पुढील तारीख देतात. मात्र, बराच कालावधी तक्रारदार हजर न राहिल्यास, असे दावे मंचाकडून निकालात काढण्यात येतात. साधारणपणे दीड ते दोन वर्षे तक्रारदार हजर न राहिल्यास ग्राहक मंचाकडून, असे पाऊल उचलले जाते. असा प्रकारे दावे निकाली काढल्याची संख्या वाढत आहे. अनेक प्रकरणांत बाहेरच प्रकरण मिटवले जाते. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे.
- अ‍ॅड. सुदीप केंजळकर

Web Title: Do not wake up, run away the customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.