भारतातील 114 ठिकाणी राेहित वेमुलावरील डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 09:10 PM2019-01-19T21:10:55+5:302019-01-19T21:12:40+5:30
राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन राेहितच्या तिसऱ्या स्मृती दिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले.
पुणे : 17 जानेवारी 2017 ला हैद्राबाद विद्यापीठातील वसतीगृहाच्या खाेलीमध्ये दलित विद्यार्थी राेहित वेमुला याने आत्महत्या केली हाेती. त्याच्या आत्महत्येला प्रशासनाला जबाबदार ठरविण्यात आले हाेते. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला हाेता. देशभरात विद्यार्थ्यंनी माेर्चे काढले हाेते. राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे स्क्रिनिंग राेहितच्या तिसऱ्या स्मृतीदिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले. पुण्यातील पुणे कलेक्टिव्ह या तरुणांच्या ग्रुपने सुद्धा या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन केले.
राेहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली हाेती. हैद्राबाद विद्यापीठाने राेहित व त्याच्या साथिदारांना हाॅस्टेलमधून निलंबित केले हाेते. राेहित हा दलित असल्याने त्याला अन्यायकारक वागणूक दिल्याचा आराेप विद्यार्थ्यांनी केला हाेता. देशभरात राेहितच्या समर्थनार्थ अनेक माेर्चे निघाले. राेहितच्या आत्महत्येमागील पार्श्वभूमी व त्यानंतर झालेली आंदाेलने, राजकारण याचा मागाेवा घेण्याचा प्रयत्न या डाॅक्युमेंटरीतून करण्यात आला आहे. या डाॅक्युमेंटरीमधील दृश्ये ही सत्य असून त्या त्या वेळी ती चित्रीत करण्यात आली आहेत. दीपा धनराज यांनी या डाॅक्युमेंटरीचे दिग्दर्शन केले आहे.
दीपा यांनी राेहितच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त ज्यांना या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन करायचे आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले हाेते. पुण्यातील पुणे कलेक्टिव्ह या तरुणांच्या ग्रुपने या डाॅक्युमेंटरीसाठी दीपा यांना संपर्क केला हाेता. 17 तारखेला काेथरुडमधील एका बंगल्यात या डाॅक्युमेंटरीचे स्क्रिनिंग करण्यात आले. हे स्क्रिनिंग आयाेजित करणारा अनुज देशपांडे म्हणाला, राेहित वेमुलाची आत्महत्या ही आपल्या देशातील एक महत्वाची घटना आहे. या डाॅक्युमेंटरीच्या माध्यमातून त्याच्या आत्महत्येमागील सत्य समजून घेता येईल या उद्देशाने आम्ही या डाॅक्युमेंटरीचे स्क्रिनिंग आयाेजित केले हाेते.