कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:04+5:302021-07-16T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस, तसेच सुपरफास्ट दर्जाच्या तर काही मार्गावर राजधानी, हमसफर व शताब्दीसारख्या महत्त्वाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस, तसेच सुपरफास्ट दर्जाच्या तर काही मार्गावर राजधानी, हमसफर व शताब्दीसारख्या महत्त्वाच्या गाड्या सुरू केल्या. मात्र सर्वसामान्य प्रवाशांची हक्काची व कमी तिकिटात प्रवास घडविणा-या पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कोरोनाचे कारण सांगून अजूनही पॅसेंजर गाड्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?असा सवाल प्रवाशातून विचारला जात आहे.
रेल्वेने प्रवासी सेवा सुरू करताना विशेष दर्जाच्या गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याचे सर्व सवलती रद्द होऊन प्रवाशाना आरक्षित तिकीट काढावे लागत आहे. अजूनही पॅसेंजर रेल्वे, जनरल तिकीट विक्री बंद आहे.
बॉक्स १
१) सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी, पुणे- सोलापूर हुतात्मा, पुणे-जम्मू तावी झेलम, पुणे-दानापूर, पुणे -हावडा एक्स्प्रेस, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, उद्यान एक्स्प्रेस, पुणे-बिलासपूर आदी गाड्या सुरू आहेत.
बॉक्स २ :
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या
यशवंतपूर-जयपूर, बंगळुरू-अजमेर, जोधपूर-बेंगळुरू, गांधीधाम-बेंगळुरू, अजमेर-म्हेसूर, मुंबई-नागरकोईल, कुर्ला -चेन्नई एक्स्प्रेस आदी गाड्यांना फेस्टिव्हल गाड्यांचा दर्जा दिला. त्यामुळे त्याचे तिकीट दर जवळपास शंभर ते एकशे दहा रुपयांनी वाढले आहे.
बॉक्स ३
मग पॅसेंजर बंद का?
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या जवळपास १२ पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत. यात पुणे-निजामाबाद, पुणे-मनमाड, पुणे-सोलापूर, पुणे-दौंड, शिर्डी-मुंबई, पुणे-सातारा, पंढरपूर-मुंबई, पनवेल-बारामती आदी पॅसेंजर अद्याप बंद आहेत.
बॉक्स ४
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा अजून निर्णय झाला नाही. त्याबाबत काही निर्णय झाला तर त्याची सूचना देऊन लागलीच अंमलबजावणी केली जाईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे