Raj Thackeray In Pune: राज्यपालांना काही समज आहे का? राज ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 07:53 PM2022-03-09T19:53:11+5:302022-03-09T20:00:10+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. वर्धापनदिनासाठी गणेश कला क्रीडा मंदिर हाऊसफुल झाले आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. त्यावरून राज ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे म्हणाले, राज्यपालांना शिवाजी महाराज, रामदास स्वामी काही माहिती आहे का. नुसती भांडण लावायची एकाच शौर्य आणि एकाची विद्वत्ता कमी करायची असही ते म्हणाले आहेत. राज्यपाल तुम्हाला रामदास स्वामी, शिवाजी महाराज कळतात का? आपला अभ्यास नसताना आपण बोलून जायचं कि, रामदास स्वामी यांनी जे लिहिलं आहे ते मी माझ्या घरात आहे इतकं चांगला महाराज यांच्या बद्दल लिहलंय ते कोणीच लिहलेले नाही. असं उगाच काहीतरी सांगायचं.
लॉकडाऊनची शांतता बारी होती
कोणी विचार केला नसेल घरातल्या माणसाने दिलेला पाण्याचा ग्लास उचलावा कि नाही असं वातावरण झालाय, दोन दिवसांनी माझी कन्याला घेऊन बाहेर आलो तेव्हा मला पक्षयांचे आवाज ऐकले होते. लॉकडाऊन काळात फक्त पक्षांचे आवाज होते, शांतता भीतीदायक होती पण चांगली होती. त्या वातावरणात भीती होती पण आता सगळे एकत्र आले आहेत. या वातावरणातून आता आपण सगळे पुढे जात आहेत. संकट आता सुरूच आहेत. येतं हातात हात घालून येतात. आमच्या पक्षावर संकट येत असतात. या प्रसांगाना सामोरे जायचं असत, त्यातून आपण काय घेतले याच विचारे करायचा असतो.