खरपुडी, रेटवडी परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ, रेबीजची लसही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 01:50 AM2018-11-13T01:50:15+5:302018-11-13T01:50:47+5:30

खरपुडी, रेटवडी परिसरात पिसाळेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून या गावात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. खरपुडी येथील नीता

Dogs in Kharudi, Retwadi area, Rabies vaccine | खरपुडी, रेटवडी परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ, रेबीजची लसही मिळेना

खरपुडी, रेटवडी परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ, रेबीजची लसही मिळेना

googlenewsNext

दावडी : खरपुडी, रेटवडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. नागरिकांसह जनावरांनाही पिसाळलेली कुत्री चावा घेऊन जखमी करीत आहेत. त्यामुळे या परिसरात या कुत्र्यांची दहशत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

खरपुडी, रेटवडी परिसरात पिसाळेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून या गावात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. खरपुडी येथील नीता काशिद, रेटवडी येथील बाबूराव खंडागळे, गुलाब पवार, दिलीप वाबळे यांच्यासह अनेक नागरिक, वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच चार दिवसांत या परिसरात गाय, बैल, लहान वासरे अशा १८ जनावरांना चावा घेतला आहे. आज (दि. १२) रेटवडी येथील तुकाराम पवार, तानाजी पवार यांच्या दोन गार्इंना, तसेच वामन बोºहाडे, रामचंद्र पवार यांच्या ३ शेळींना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच गाई व शेळ्यांवर रेटवडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमोडे यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जनावरांवर उपचार केले असल्याचे सांगितले. या संपूर्ण घटनेनंतर या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

रेबीजची लस मिळेना
कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत या परिसरात वाढ झाली आहे. ‘रेबीज’ आजाराला प्रतिबंध करणाºया लसी महागड्या असून, चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील गरीब नागरिक खासगी दवाखन्यात जादा पैसे आकाराले जात असल्याने त्याचा पूर्ण ‘कोर्स’ करण्यास पैसे नसल्याने टाळाटाळ होते. काही नागरिक बळी पडतात. कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या असून. आता तरी आरोग्य प्रशासनाला जाग येणार की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

४राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खेड तालुक्यातून रोज १० ते १२ कुत्र्यांनी चावा घेतलेले रुग्ण येतात. येथे मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाºया कुत्रा चावणाºया नागरिकाला प्रथम लस देण्यात येते.
४तसेच, तालुक्यातील इतर भागातून येणाºया नागरिकांना लस असेल तरच दिली जाते. किंवा चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र तिथे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना थेट पुण्याला जावे लागते.

ग्रामीण रुग्णालयात लस होती, मात्र सध्या संपलेली आहे. आम्ही कुत्रा चावलेल्या नागरिकांना वायसीएम, ससून येथे लस घेण्यासाठी जाण्यास सांगतो. दोन दिवसांत येथे लस उपलब्ध होणार आहे. त्याबाबत माझा पाठपुरावा सुरू आहे.
- गीता कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक
ग्रामीण रुग्णालय, चांडोली

Web Title: Dogs in Kharudi, Retwadi area, Rabies vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.