नितीन कीर्तने, अजय कामत यांना दुहेरी मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:32 AM2021-02-20T04:32:23+5:302021-02-20T04:32:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोलारीस क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या सोलारीस करंडक वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नितीन कीर्तने, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोलारीस क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या सोलारीस करंडक वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नितीन कीर्तने, केतन धुमाळ, अजय कामत यांच्यासह नाशिकच्या श्रीकांत पारेख व एम. सुरेश यांनी एकेरीमध्ये आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले. पुण्याच्या अजय कामत आणि नितीन कीर्तने यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला.
सोलारीस क्लब, मयूर कॉलनी आज संपलेल्या या स्पर्धेच्या ३५ वर्षांवरील गटामध्ये पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये प्रवेश केलेल्या पुण्याच्या केतन धुमाळ याने पुण्याच्याच नीरज आनंदचा पराभव करून स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. ४५ वर्षांवरील गटामध्ये नितीन कीर्तने याने मुंबईच्या नीलकंठ डाबरेचा पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी या गटाचे विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीसचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल :
एकेरी गट
७० वर्षांवरील गटः श्रीकांत पारेख वि.वि. गंगाधरन एस. ६-२, ६-०;
६५ वर्षांवरील गटः एम. सुरेश वि.वि. अब्दुल हनिफ ६-४, ६-४;
५५ वर्षांवरील गटः अजय कामत वि.वि. निर्मल कुमार ६-०, ६-०;
४५ वर्षावरील गटः नितीन किर्तने वि.वि. नीलकंठ डाबरे ६-२, ६-१;
३५ वर्षावरील गटः केतन धुमाळ वि.वि. नीरज आनंद ६-३, ६-३;
दुहेरी गट
७० वर्षावरील गटः अजित पेंढारकर/ताहील अली वि.वि. रामराव/पद्मालू ६-३, ६-४;
६५ वर्षावरील गटः अब्दुल हनिफ/संजय रासकर वि.वि. एम.सुरेश/व्हिएसएनएल राजु ६-२, ०-६, १०-७;
५५ वर्षावरील गटः अजय कामत/जयंत कढे वि.वि. मेहर प्रकाश/चेतन देसाई ६-३, ६-२;
४५ वर्षावरील गटः नितीन किर्तने/संदीप किर्तने वि.वि. मुकूंद जोशी/आर. कुलकर्णी ६-०, ६-१;
३५ वर्षावरील गटः मंदार वाकणकर/अभिषेक ताम्हाणे वि.वि. विजय आनंद/अफरोझ खान ६-३, ६-३;