फुरसुंगी : या परिसरात कचºयाचे ओपन डम्पिंग होत असल्याने परिसरात मोट्या प्रमाणावर दुगंर्धी पसरली जाते. येथील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा माथी मारून विकास कामे न करता येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळात असल्याने येथून पुढे कचºयाचे ओपन डम्पिंग करू दिले जाणार नाही. असा इशारा कचºयाच्या गाड्या अडवून येथील नागरिकांनी आज दिला.गावातील शेतकर्यांचे नावे पुठे करून मोकळ्या शेतात राजरोषपणे कचºयाच्या गाड्या खाली केल्या जातात , प्रति कचरा डंपर ५०० ते १००० रु घेतले जाते. परिणामी कचरा फुकट मिळत असतानाही कचरा विक्रीचा बाजार फुरसुंगी मध्ये मांडला जात आहे . असा आरोप फुरसुंगी मधील शेतकर्यांनी आज केला आहे तसेच संबंधीत गावातील नागरिकास कमी दरात गाड्यामधील डिझेल विकले जाते, त्याकडे पालिकेचे लक्ष नाही. या ठिकाणी ओला कचरा खाली केल्यामुळे परिसरांत दुगंर्धी, निचडचे पाणी, डास, नवीन प्रकारच्या निळ्या रंगाच्या माश्या, आळया तयार होऊन फुरसुंगी करांचे आरोग्य धोक्यात आले आहे, पर्यावरण विभाग तसेच कोर्टच्या आदेशानुसार कचरा ओपन डंप करू नये या निर्णयाला सरास हरताळला तसेच उल्लंघन करण्याचे काम पुणे मनपाकडून केले जात आहे. अशा प्रकारे फुरसुंगी गावात पुन्हा ओला कचरा खाली करु नये. अशा प्रकारचा इशारा ग्रमस्थाच्या वतीने देण्यात आला. या वेळी विशाल हरपळे, नागेश हरपळे, रवि चंद, महेश चोरघडे, सागर पवार, दत्ता दिघे, विकास हरपळे, यशवंत कुटे, दत्ता होळकर, गणेश हरपळे, तानजी कुटे, अजय जाधव आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ यांच्या वतीने निदेर्शासुार ओपन डंप करू दिले जाणार नाही अन्यथा उद्या पासुन तीव्र आंदोलन केले जाईल.
शेतात करतात कचऱ्याच्या गाड्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:58 AM