इंदापूरच्या सूर्यमंदिराचे स्वप्न अपूर्णच राहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:16 AM2018-06-13T02:16:27+5:302018-06-13T02:16:27+5:30

उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सन २०००मध्ये इंदापूरमधील कनुभाई पटेल यांच्या घराजवळील जागेत सूर्योदय परिवार नावाने सेवाश्रमाची स्थापना केली. या जागेत भय्यूजी महाराज यांनी नदीच्या कडेला डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्यासाठी कामाला सुरुवात केली होती.

The dream of the Surya Mandir in Indapur remained incomplete | इंदापूरच्या सूर्यमंदिराचे स्वप्न अपूर्णच राहिले

इंदापूरच्या सूर्यमंदिराचे स्वप्न अपूर्णच राहिले

Next

इंदापूर  -  उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सन २०००मध्ये इंदापूरमधील कनुभाई पटेल यांच्या घराजवळील जागेत सूर्योदय परिवार नावाने सेवाश्रमाची स्थापना केली. या जागेत भय्यूजी महाराज यांनी नदीच्या कडेला डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्यासाठी कामाला सुरुवात केली होती. मंदिराचा आराखडा बनवून फाउंडेशनपर्यंत मंदिराचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर काही कारणांनी मंदिराचे पुढील काम होऊ शकलेले नाही. सूर्यमंदिर निर्माण करणे हे त्यांचे आयुष्यातील महत्त्वाचे स्वप्न होते; परंतु ते अधुरेच राहिले.
२००८ पर्यंत आश्रमाचे काम पटेल यांच्या जागेत चालू होते. आश्रमासाठी २००८मध्ये इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक गोरख शिंदे यांनी त्यांच्या मालकीची ५ गुंठे जमीन राधाकृष्ण अपार्टमेंट, पडस्थळ रोड या ठिकाणी दिली. या जागेत मोठा सभामंडप व आतमध्ये नाथमहाराजांची गादी व शेजारी भय्यूजी महाराज यांची गादी आणि पुढे प्रशस्त सभामंडप अशा पद्धतीने आश्रमाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी इंदापूर व परिसरातील सर्व भक्तगण सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांची सेवा करतात. वर्षातून ६ ते ७ वेळा भय्यूजी महाराज इंदापूरला भक्तगणांना दर्शन देण्यासाठी येत असत.
इंदापूरपासून १० किलोमीटरवर सोलापूर-पुणे महामार्गालगत असणारे मौजे हिंगणगाव या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर पूर्वी जुने हिंगणगाव वसले होते; परंतु उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर या हिंगणगावाचे स्थलांतर झाले. पुणे-सोलापूर महामार्गाच्या पलीकडे डोंगरमाथ्यावर ते गाव वसले. त्यामुळे जुन्या हिंगणगाव गावठाणाची २२ एकर जागा गाव समितीने ठराव करून भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवार ट्रस्टला बक्षीसपत्र म्हणून देण्यात आलेली आहे. या जागेत भय्यूजी महाराजांनी नदीकाठी डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, मंदिराचे पुढील काम होऊ शकलेले नाही.

सध्या सूर्यमंदिराच्या जागेत सूर्योदय परिवार इंदापूरच्या वतीने देशी गार्इंची शाळा चालविली जात आहे. सध्या या शाळेत ४० पेक्षा जास्त गार्इंचे संगोपन करण्यात येत आहे.
त्यांना वैरण व चारा यासाठी लागणारा सर्व खर्च भक्तगण वर्गणी जमवून करीत असल्याची माहिती भय्यूजी महाराजांचे इंदापुरातील निकटवर्ती भक्त प्रदीप पवार, सतीश कस्तुरे व रवींद्र माने यांनी दिली.

Web Title: The dream of the Surya Mandir in Indapur remained incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.