डीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:22 AM2018-11-15T01:22:44+5:302018-11-15T01:23:30+5:30

याबाबत माहिती देताना अ‍ॅड. केंजळकर म्हणाले, दिलेल्या मुदतीत सदनिका मिळेल याची शक्यता नव्हती तसेच डीएसके यांना अटकही

DSK's bid to pay money, including interest to customers | डीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश

डीएसके यांना महारेराचा दणका, ग्राहकांना व्याजासहित पैसे देण्याचे आदेश

googlenewsNext

पुणे : करारात ठरल्याप्रमाणे सदनिकेचे पैसे देऊनही घराचा ताबा न देणाऱ्या डीएसके यांना महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीने (रेरा) दणका दिला आहे. संबंधित ग्राहकाला सदनिका घेतल्यापासून १०.६५ टक्के व्याज दराने पैसे देण्याचा आदेश दिला असून, दाव्याच्या खर्चा पोटी 20 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

या प्रकरणी मुंबई येथे राहणारे शब्बीर शामशी आणि त्यांची पत्नी यांनी डी एस के यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. डीएसके यांनी शामशी यांच्याकडून 1 कोटी 8 लाख 1 हजार रुपये किंमतीची सदनिका घेण्यासाठी करार केला होता. शामशी यांची डीएसके यांचा डीएसके ड्रीम सिटीत वॉटर फॉल रेसिडेन्सी मध्ये फ्लॅट बुक केला होता. करारात ठरल्या प्रमाणे त्यांनी डीएसके यांना पैसे  दिले होते. तसेच 5 लाख 99 हजार  रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि  नोंदणी शुल्क देखील भरले होते. मात्र मुदतीत सदनिकाच मिळाली नाही. त्यामुळे शामशी यांनी अ‍ॅड. सुदीप केंजळकर यांच्यामार्फत महारेराकडे याचिका दाखल केली होती. 


दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने १०.६५ टक्के दराने व्याजासह रक्कम ग्राहकाला परत करावी असा आदेश दिला. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दाव्याच्या खर्चापोटी 20 हजार रुपयांची रक्कम ग्राहकाला द्यावी. ही रक्कम 30 दिवसांत ग्राहकाला द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला.


या बाबत माहिती देताना अ‍ॅड. केंजळकर म्हणाले, दिलेल्या मुदतीत सदनिका मिळेल याची शक्यता नव्हती तसेच डीएसके यांना अटकही झाली आहे. असा युक्तिवाद करण्यात आला होता. ही बाब न्यायालयाने ग्राह्य धरत व्याजासह रक्कम परत देण्याचा आदेश दिला आहे.  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: DSK's bid to pay money, including interest to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.