करोनाच्या वाढत्या संसगार्मुळे धर्मादाय कार्यालयात नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:32 AM2021-02-20T04:32:37+5:302021-02-20T04:32:37+5:30
पुणे : शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने धर्मादाय कार्यालयात संसर्गाला आळा घालण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. धर्मादाय ...
पुणे : शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने धर्मादाय कार्यालयात संसर्गाला आळा घालण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. धर्मादाय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकांनी मुखपट्टीचा वापर करणे तसेच जंतुनाशकाचा वापर करणे बंधनकारक आहे.
धर्मादाय कार्यालयात पक्षकार, वकिलांनी कामाशिवाय गर्दी करू नये, तसेच संसर्गाला आळा घालण्यासाठी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केले आहे. कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी कागदपत्रांची स्वीकृती, हिशेबपत्रके दाखल करणे, सही शिक्क््याचा नकला प्राप्त करणे यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. पुणे हे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे सोलापूर, सातारा, अहमदनगर तसेच पुणे जिल्ह््यातील पक्षकार मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे कार्यालयात कायम गर्दी असते. त्यामुळे पक्षकारांसह वकिलांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, असे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मुकेश परदेशी आणि सचिव राजेश ठाकूर यांनी सांगितले.
धर्मादाय विभागाने राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. जेणेकरून पक्षकारांना कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. बाहेरगावातील वकिलांनी त्यांच्या प्रकरणाचे कामकाज हाताळता येईल तसेच युक्तीवादही करता येईल, असे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे विश्वस्त अँड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी नमूद केले.
--