पावसामुळे फळभाज्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:12 AM2018-06-18T01:12:43+5:302018-06-18T01:12:43+5:30
पावसामुळे रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
पुणे : पावसामुळे रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. आवक आणि मागणी देखील चांगली असल्याने फळभाज्यांचे दर स्थिर होते. तर टॉमेटो, आले, भुईमुगाची आवक खूपच वाढल्याने दरामध्ये ५ ते १० टक्क्यांची घट झाली. मागणी वाढल्याने कोबी, घेवडा, तोतापुरी कैरीच्या दरामध्ये काही प्रमणात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवार (दि.१७) रोजी सुमारे १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली.
यामध्ये परराज्यातून हिमाचल प्रदेशमधून ३ ट्रक मटार, गुजरात, कर्नाटक येथून ६ ते ७ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकमधून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, तर इंदोर येथून ४ ते ५ टम्ेपो गाजराची आवक झाली.
>मध्य प्रदेश आणि गुजरातमधून चार ते साडेचार हजार गोणी लसणाची आवक झाली. तर स्थानिक भागातून सातारी आले १७०० ते १८०० पोती, टॉमेटो ५ ते ६ हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, गावरान कैरी ८ ते १०, भुईमूग ३०० पोती, गाजर ३०० पोती, कांद्याची ७० ते ७५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ४५ ट्रक इतकी आवक झाली.
>फुलांचे दर स्थिर
जिल्ह्यात पावसाने दिलेली उघडीप आणि अधिक महिना संपल्याने बाजारात फुलांची आवक वाढली आहे. मागणी साधारण असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांचे दर स्थिर आहेत. दरम्यान, यवत परिसरातून भाग्यश्री शेवंती बाजारात दाखल झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला भाग्यश्रीच्या प्रती किलोस १०० ते १८० रुपये भाव मिळाला आहे. रमजान ईदमुळे गेले दोन दिवस गुलछडी आणि मोगऱ्याला मागणी वाढून त्याच्या दरातही वाढ झाली होती, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
>पालेभाज्यांची तेजी कायम
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी पालेभाज्यांचीदेखील चांगली आवक होती. कोथिंबीरच्या तब्बल १ लाख जुड्यांची आवक झाली, तर मेथीच्या केवळ ३० हजार जुडी आवक झाली. अन्य भाज्यांची आवकदेखील सरासरी एवढीच होती. आवक वाढली तरी मागणीदेखील चांगली असल्याने पालेभाज्यांची तेजी कायम आहे. यामध्ये घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या प्रतिजुडीस ८ ते १५ रुपये, तर मेथीस ८ ते १५ रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात कोथिंबिरीची १० ते १५ व मेथीच्या जुडीची १५ ते २० रुपयांनी विक्री करण्यात येत होती. कांदापात १५ ते २० रुपये जुडी दर मिळाले, तर विलास भुजबळ याच्या गाळ्यावर मोठ्या प्रमाणात घोळाच्या भाजीची आवक झाली. घोळाच्या भाजीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्याने या भाजीला चांगली मागणी असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
>रमजान संपल्याने फळांची मागणी घटली
ढगाळ वातावरण आणि रमजानचा महिना संपल्याने बाजारात सर्व प्रकारच्या फळांना मागणी घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कलिंगड आणि पपईच्या दरात ५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर, डाळिंबाच्या दरात १० टक्क्यांनी वधारले आहे. इतर फळांची आवक जावक कायम असल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.
दरम्यान, उन्हाळा संपल्याने सरबतविक्रेते, गुºहाळे तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांना मागणी कमी होत असल्याने दरातही मोठी घट झाली आहे. रविवारी येथील फळबाजारात अननस ६ ट्रक, मोसंबी १५ टन, संत्री ५० ते ६० क्रेटस, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ८ ते १० टेम्पोे, लिंबाची ५ ते ६ हजार गोणी, चिक्कू ४०० डाग, पेरु ५० क्रेटस,कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबुज १० ते १२ टेम्पो, सीताफळ १ टन, आंब्याची १५ ते २० टन इतकी आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.