मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे इंदापूरची शेती तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:31 AM2018-09-29T01:31:04+5:302018-09-29T01:31:15+5:30
खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कळस - खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे या चारही तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांतील पाणी या कालव्यामधून चार तालुक्यांतील शेतीला व पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. हवेली, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या कालव्यामधून पाणीपुरवठा होतो. पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. त्या वेळी चार टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होते.
पुण्याची मागणी वाढल्याने शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. नवा मुठा उजव्या कालव्यातून शेतीला व बंद पाइपलाइनमधून शहराला पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती होईपर्यंत कालव्यामधून शेतीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शेतकºयांना मात्र घाम फुटणार आहे.
मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणले
रेडणी : इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना या वर्षी पावसाच्या संकटाने ग्रासले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकºयांकडून कालव्याच्या पाण्याची मागणी झाली होती. त्यानुसार खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यातदेखील आले; परंतु गुरुवारी पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत.
या वर्षी कमी पावसामुळे ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. वाढत्या तापमानामुळे बहर धरलेल्या डाळिंबबागांची फूलगळ होत आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपली आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी जलसंपदा अधिकाºयांना पाणी सोडण्यासाठी धारेवर धरले होते. त्यानंतर खडकवासल्याचे पाणी इंदापुरातील शेतकºयांना सोडण्यात आले होते; परंतु काल पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे ते बंद करण्यात आले. यामुळे ‘दुष्काळात तेरावा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.