पुणे : यंदा पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर पडलेला ओला दुष्काळाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून रविवार (दि.३) रोजी कांद्याला मागील दोन वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. रविवारी कांदा-बटाटा विभागात कांद्याला ५५० ते ५८० रुपये प्रतिदहा किलोस दर मिळाला. मार्केटयार्डात १३० ट्रक कांद्याची आवक झाली होती. यामध्ये जुन्या कांद्याची ११० ट्रक तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली.
यंदा परतीचा पाऊस लांबला असून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. कर्नाटक राज्यातही पाऊस सुरु आहे. मात्र जुना आणि चांगला दर्जाचा कांदा केवळ महाराष्ट्रातच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यास कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याता परिणाम कांद्याच्या दरात वाढ हाेण्यामध्ये झाला. चांगल्या प्रतिच्या नवीन कांदा बाजारपेठेत दाखल होण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. जुन्या कांद्याचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला़.
चार दिवसांपासूनच दर वाढण्यास सुरुवातगेल्या चार दिवसांमध्ये दररोजच कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. बुधवारी ४०० रुपये, गुरुवारी ४५० रुपये शुक्रवारी ४८० ते ५०० रुपये आणि रविवारी ५८० रुपये प्रतिदहा किलोस भाव होता. रविवारी मिळालेला भाव हा गेल्या दोन वषार्तील उच्चांकी भाव आहे.
किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलोघाऊक बाजारात कांदा ५५ ते ५८ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मात्र किरकोळ बाजारात ७५ ते ८० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेते वाढीव दराने विक्री करत असल्याचेही ग्राहकांनी सांगितले.
चांगल्या दर्जांच्या कांद्याचा तुटवडाबाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रतिचा कांदा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथून मागणी वाढली आहे़ परिणामी कांद्याच्या भावात वाढ होत आहे. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे भाववाढ झाली आहे.- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी