चलनाअभावी काम ठप्प

By admin | Published: November 15, 2016 03:48 AM2016-11-15T03:48:17+5:302016-11-15T03:48:17+5:30

पाचशे-हजारांच्या नोटांची बंदी करून सहा दिवस झाले. मात्र, परिस्थिती सुधारण्या ऐवजी अधिकच बिघडत चालली असल्याचे चित्र आहे.

Dump work idle due to walk | चलनाअभावी काम ठप्प

चलनाअभावी काम ठप्प

Next

चंदननगर : पाचशे-हजारांच्या नोटांची बंदी करून सहा दिवस झाले. मात्र, परिस्थिती सुधारण्या ऐवजी अधिकच बिघडत चालली असल्याचे चित्र आहे. चलनाअभावी काम बंद पडल्याने मोलमजुरी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूरअड्डे तुडुंब झाले आहेत.
वडगावशेरीतील जुना-मुंढवा रस्त्यावरील गणेशनगर चौकातील परिसरातील एकमेव मजूर अड्डा हा तुंबलेला पाहावयास मिळत आहे. नोटाचा तुटवडा गुरूवारपासून जाणवू लागल्यामुळे मुजरांना त्यांचा दिवस घालवणे कठीण झाले
आहे.
या ठिकाणच्या बहुतांशी मजुरांना दररोज हजेरी रूपी पैसे मिळायचे. मात्र, ५००,१०००च्या नोटा बंदीमुळे आणि नवीन नोटा पुरेशा उपलब्ध नसल्याने मजुरांना दररोजचा पगार द्यायचा कसा, असा प्रश्न बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना पडला आहे. यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशांअभावी परिसरातील बांधकामे बंद पडली आहेत. त्यामुळे कामे बंद ठेवली असल्याचे बांधकाम ठेकेदार सांगत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dump work idle due to walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.