पुणे जिल्ह्यात कोरोना काळात '108' रुग्णवाहिका ठरली 46 हजार रुग्णांसाठी वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 11:20 AM2020-12-15T11:20:42+5:302020-12-15T11:21:33+5:30
ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकांचाच होता आधार
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : कोरोना रुग्णांसाठी शासनाची 108 या रुग्णवाहिकेची सुविधा ख-या अर्थाने वरदान ठरली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या 102 रुग्णवाहिका तर 24 तास कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल आहेत. यामुळे किमान ग्रामीण भागात तरी रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून एखाद्या रुग्णावर जीव गमावण्याची वेळ आली नाही. गेल्या नऊ महिन्याच्या कोरोना काळात जिल्ह्यात तब्बल 46 हजार 586 रुग्णांना जीवदान दिले. यात 19 हजार कोरोना रुग्ण होते.
जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोना काळात तब्बल 226 सरकारी रुग्णवाहिका कार्यरत होत्या.या 108 च्या 82 रुग्णवाहिका असून, यातील 31 रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्यात. तर जिल्हा परिषदेच्या 102 सुविधेच्या 92 रुग्णवाहिका आणि खाजगी 52 रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सर्व कोविड केअर सेंटरमध्ये या रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात गंभीर होणा-या प्रत्येक कोरोना रुग्णाला सरकाली रुग्णवाहिके मार्फतच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील कोरोना हाॅस्पिटलमध्ये येऊन येतात. यामुळेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी या सरकारी रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध आहेत.
-------
- जिल्ह्यात 108 च्या रुग्णवाहिका : 82
- 108 च्या रुग्णवाहिका चालक : १७०
- 108 च्या रुग्णवाहिका डॉक्टर्स : २०७
--------
कोरोनासाठी 108 सुसज्ज
कोरोनाच्या काळात डॉक्टर, चालक यांना कोरोना रुग्ण हाताळणीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले व त्यांना पी पी ई कीट हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्स,मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक कोरोना बाधित किव्हा संशयाती रुग्ण हाताळल्या नंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करून पुढील रुग्ण हाताळायला तयार केली जाते.
----
सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी तत्पर
पुणे जिल्या मध्ये एकूण ८२ रुग्णवाहिका असून, त्यापैकी २४ रुग्णवाहिका (ALS) व ५८ रुग्णवाहिका (BLS) आहेत कोरोना काळामध्ये अति गंभीर झालेल्या रुग्णांना, व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन वर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळाले आहे. रुग्नावाहीकेवर डॉक्टर असल्यामुळे त्वरित रुग्णांवर उपचार सुरु करून हॉस्पिटलला अडमिट केले जाते.
- विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक १०८ रूग्णवाहिका
-------
... अन् गंभीर रुग्णाला जीवदान मिळाले
मला १०८ कंट्रोल रूम वरून रात्री ३.१० वा. फोन आला. एक रुग्ण अतिशय गंभीर असून, त्याला पुढील उपचार साठी हॉस्पीटला पाठवायचे आहे. आम्ही १० मिनिटात पोहोचलो १०८ रुग्नावाहीकेवरील डॉक्टर सुनील वायदंडे यांनी रुग्णांना बघितले ती रुग्ण अतिशय गंभीर अवस्तेत होती. तिला व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन लागणार होता. त्या रुग्णाला व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन देऊन उपचार करत रुग्णालयात दाखल केले व त्या रुग्णाचा जीव वाचला.
- सुनील जाधव, चालक, येरवडा पुणे