नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले एकाच व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 12:40 PM2022-03-06T12:40:25+5:302022-03-06T13:14:17+5:30
उपमुुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर...
पुणे: महाराष्टाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. कारण होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (pm narendra modi pune metro) पुणे दौरा.
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर पुणे मेट्रोचे (pune metro) उद्घाटन करत मोदींनी मेट्रोतून प्रवास केला. कोथरूडमधील एमआयटी कॉलेजच्या आवारात नरेंद्र मोदींची सभा झाली. यावेळी पुणेकरांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले-
- पुण्याकरता आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पंतप्रधान यांनी मेट्रो प्रवास केलाय, पंतप्रधान यांनी तिकीट काढून प्रवास केला .
- महामेट्रोने विक्रमी वेळेत मेट्रोचे काम केलं आहे. पुणे मेट्रोने नवीन मॉडेल देशाला दिलं आहे.
- जायका प्रकल्प सुरू होतोय. स्वच्छ नदी लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. ई-बसचा मोठा ताफा आला आहे आणि १०० टक्के इंधन मुक्त गाड्या येतील याचा विश्वास आहे.
अजित पवार काय म्हणाले-
- अनेक वर्षी इच्छा होती की ही विकास काम लवकर व्हावी या भूमिपूजन उदघाटन कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थिती राहिले त्याबद्दल आभार
- नरेंद्र मोदी ज्यांना आदर्श मानता त्याच शिवाजी महाराज यांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा पुढे नेण्याचा काम आम्ही करतोय. तुम्ही आम्हाला सहकार्य केल त्याबद्दल धन्यवाद.
- मला पंतप्रधान याना लक्षात आणून द्यायचं आहे की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे.