विद्यार्थ्यांच्या चांगल्या करिअरसाठी ‘यशाचा सोपा मंत्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:44 AM2018-01-15T06:44:54+5:302018-01-15T06:45:10+5:30
वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली, तर यश मुठीत असते. या अनुषंगाने ११वी, १२वी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना करिअरसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी
पुणे : वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली, तर यश मुठीत असते. या अनुषंगाने ११वी, १२वी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना करिअरसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल व धैर्य उंचाविण्यासाठी चेन्नईतील ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’ प्रस्तुत ‘यशाचे मंत्र’ या सेमिनारचे बुधवारी (दि.१७) आयोजन केले आहे. साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी अॅकॅडमी आॅफ इ-लर्निंग ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, शिवदर्शन, सहकारनगर येथे सकाळी १० वाजता सेमिनार होणार आहे.
विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर आणि जीवन घडविण्याचा मंत्र या सेमिनारमध्ये मिळणार आहे. यामध्ये मोटिव्हेशनल ट्रेनर विवेक म्हेत्रे व एसआरएम युनिव्हर्सिटीचे वक्ते, असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअर डॉ. अशोककुमार प्रधान व आॅॅटोमोबाईल इंजिनिअरिग्ांचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख डॉ. एम. लिनस मार्टिन हे मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारच्या अगोदर विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी रायटिंग पॅड, वही, पेन सोबत आणावे. त्यानंतर सेमिनार होईल. त्या दरम्यान चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
तरी ‘यशाचे मंत्र ’या सेमिनारचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, व्हिया व्हेंटेज, पहिला मजला, लॉ कॉलेज रोड, पुणे. ०२०-६६८४८५८६, ८८८८७५८६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
११ वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा होणार असून, यासाठी एक तास वेळ असेल. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बुद्धिमता चाचणी, सामान्य ज्ञान (कल चाचणी) ही परीक्षा सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक टॅब, द्वितीय पारितोषिक मोबाइल, तृतीय पारितोषिक पॉवर बँक आणि उत्तेजनार्थ २ पेन ड्राइव्ह व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे मिळणार आहेत.
करिअर घडविणारा उपयुक्त सेमिनार : ११ वी, १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ‘पुढे काय?’ हा प्रश्न सतावत असतो. काही विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशा वेळी आवश्यकता असते प्रोत्साहनाची आणि सुयोग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’चा हा सेमिनार उपयुक्त ठरणार आहे.
सेमिनारची वैशिष्ट्ये
वाढवा आत्मविश्वास स्वयंप्रोत्साहन तंत्र व्यक्तिमत्त्व विकास
अॅडमिशनची पद्धत कशी असेल? योग्य इन्स्टिट्यूट कशी निवडावी ?
यशाची गुरुकिल्ली