गराडे : परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. यापुढे लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही. आॅल इंडिया परमिट गाड्यांची देशात यापुढे कोठही तपासणी करू शकता. मात्र, रिक्षाबाबत ज्या भागात त्यांना परवाना दिला आहे. त्याच भागात त्यांची तपासणी करावी, तसेच त्याच भागात काम करावे. ब्रेक चाचणी पथाच्या कामासाठी १ कोटी ३१ लाख ७२ हजार रुपये मंजूर झाले आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.दिवे (ता. पुरंदर) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे अंतर्गत ब्रेक चाचणी पथाचे लोकार्पण रावते यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी रावते बोलत होते. परिवहन विभागाचे राज्याचे प्रधान सचिव मनोज सैनिक, सह परिवहान आयुक्त प्रसाद महाजन यांनी आपले विचार व्यक्त केले. मोटार वाहान निरीक्षक समीर सय्यद, श्रीराम कुलकर्णी, अश्विना मुसळे यांचा, तसेच या ट्रॅकसाठी ज्यांनी मदत केली त्यांचा हेल्मेट स्मृतिचिन्ह देऊन मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आॅनलाइन सुविधेमुळे कामे सोपी, दलालांची गोची : दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:57 PM
परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
ठळक मुद्देब्रेक चाचणी पथाच्या कामासाठी १ कोटी ३१ लाख ७२ हजार रुपये मंजूर : रावतेजलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन