शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:13+5:302021-02-06T04:18:13+5:30
आंबेठाण येथील सोळबन वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अनेक वर्षे जुनी असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक झाली होती. या ...
आंबेठाण येथील सोळबन वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अनेक वर्षे जुनी असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक झाली होती. या शाळेचे नूतनीकरण करण्याचे काम कोर्निग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडच्या माध्यमातून दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन व हस्तांतरण प्रसंगी बुट्टे पाटील बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, मनुष्यबळ विकास अधिकारी विवेक देशपांडे, सीएसआर व्यवस्थापक अमित अभ्यंकर, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच रुपाली गोणते, पोलीस पाटील तृप्ती मांडेकर, ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय मांडेकर, माजी सरपंच सुभाष मांडेकर, गणेश मांडेकर, शांताराम चव्हाण, भानुदास दवणे, सारिका आरडे, लक्ष्मण भालेराव,दत्तात्रय नाईकनवरे उपस्थित होते.
शाळेची इमारत फार जुनी आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक झाली होती. शाळा व्यवस्थापन कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या विनंतीनुसार कोर्निग कंपनीने या शाळेचे नूतनीकरण करून एक सुंदर शाळा निर्माण करून विद्यार्थ्यांना वापरास देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक शरद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत गोणते यांनी केले तर आभार मुकुंद केदारी यांनी मानले.
-
०५ आंबेठाण
आंबेठाण सोळबन वस्तीवरील शाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.