दरकवाडीत वीज कोसळून एक ठार
By admin | Published: May 12, 2016 01:26 AM2016-05-12T01:26:36+5:302016-05-12T01:26:36+5:30
बुधवारी पुणे जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.खेड तालुक्यातील दरकवाडी येथे वीज कोसळल्याने मार्तंड कोंडीभाऊ वाडेकर
पुणे : बुधवारी पुणे जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.खेड तालुक्यातील दरकवाडी येथे वीज कोसळल्याने मार्तंड कोंडीभाऊ वाडेकर (वय ३५, रा. वाडा) या युवकाचा मृत्यू झाला. तर बारामतीतील काऱ्हाटी परिसरात गोट्यावर वीज पडून एका गाईचा मुत्यू झाला. तर चार गायी होरपळल्या आहेत.
जिल्ह्यातील बारामतीसह आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची कांदा पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. तसेच दुचाकी चालकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपिट उडाली. अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेले नागरिक या पावसामुळे सुखावले आहे. तसेच काही भागांमध्ये गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते. या पाण्यामध्यून वाहनचालकांना कसरत करत आपली वाहने काढावी लागत होती.
काऱ्हाटी (ता बारामती) परिसरात गोट्यावर वीज पडून एका गाईचा मुत्यू झाला. तर चार गायी होरपळल्या आहेत. बुधवारी (दि. ११) दुपारी ३ च्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये कविता गजानन लोणकर यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्याने पेट घेतला. यावेळी कमी प्रमाणात पाऊस असताना देखील गोट्याने पेट घेतला. काही अंतरावरील जेसीबी यंत्रावर काम करणारे संदिप जगताप, रणजित जगताप, तात्या लोणकर, गंगाधर लोणकर या कामगारांनी या ठिकाणी धाव घेतली. गोट्याने पेट घेतल्याचे पाहून तातडीने हालचाली सुरू केल्या. अक्षरश: तडफडणाऱ्या पाच गायींच्या साखळया तोडुन आगीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. गोट्यात पाच मोठया, दोन लहान गायी होत्या. तसेच विजया महादेव खंडाळे यांच्या घरावरील पत्रा उडुन दोनशे मिटर अंतरावर जाऊन पडला. पाऊस थोडा पण वादळ जास्त होते. (प्रतिनिधी)