कारखान्याच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकरे म्हणाले की, शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या सेवाशर्ती व इतर सुविधा वेळोवेळी पुरविल्या जातात. तसेच राज्यस्तरावर होणाऱ्या वेजबोर्ड करारानुसार पगारवाढ दिली जाते.
कामगार कल्याण मंडळ यांचेमार्फत कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्वाधिक लाभ कारखान्याचे व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मिळतो. त्यामुळे कारखान्याचे कर्मचारी यांची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगती होत आहे. परंतु सध्या राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी असल्याने कर्मचारी पगार काही प्रमाणात मागेपुढे होत असतात. येणाऱ्या नजीकच्या काळात सर्व आर्थिक अडचणी दूर करुन मार्ग काढण्याचा व्यवस्थापन प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, सर्व अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.