कोरेगावात कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड, तीस टक्के घसघशीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:30 AM2017-10-19T02:30:57+5:302017-10-19T02:32:04+5:30

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त दोन पगार, कपडे व मिठाई भेट देऊन कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड केली. तसेच, ३५ अपंग नागरिकांनाही ३ टक्के अपंग विकास निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन विधायक पायंडा पाडल्याने

 The employees of the Koregaon double-digit Diwali, a thirteenth-floor incremental increase | कोरेगावात कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड, तीस टक्के घसघशीत वाढ

कोरेगावात कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड, तीस टक्के घसघशीत वाढ

Next

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त दोन पगार, कपडे व मिठाई भेट देऊन कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड केली. तसेच, ३५ अपंग नागरिकांनाही ३ टक्के अपंग विकास निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन विधायक पायंडा पाडल्याने कर्मचारी व अपंग नागरिकांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसत होते.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायत दरवर्षी ग्रामपंचायत कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत असते. गतवर्षी ग्रामपंचायत करसंकलनावर स्थगिती असल्याने कर्मचा-यांना डबल बोनस देण्यास ग्रामपंचायतीला अडसर निर्माण झाला होता. मात्र, या वर्षी ग्रामपंचायतीने सर्व कर्मचाºयांना ३० टक्के घसघशीत पगारवाढ केली होती. नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर ग्रामपंचायतीने कर्मचाºयांना बोनस व मिठाई भेट देण्याच्या कार्यक्रमाला प्रभारी सरपंच कल्पना गव्हाणे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, योगेश गव्हाणे पाटील, सुरेंद्र भांडवलकर, सदस्या वृषाली गव्हाणे, पूजा भोकरे, मालन साळुंखे, संगीता कांबळे, शारदा गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस व सर्व कर्मचारी, अपंग नागरिक उपस्थित होते.
या वेळी ४ क्लार्क, २ शिपाई, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, सफाई या सर्व ३३ कर्मचाºयांना दोन पगार बोनस, कपडे, मिठाई भेट देऊन कर्मचाºयांची दिवाळी गोड केली. अपंग विकास निधीतून ३५ नागरिकांना प्रत्येकी ५ हजार अ‍ॅडव्हान्स निधी दिवाळीनिमित्त भेट दिली.
या वेळी माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे यांनी सांगितले, की कामगारांना ग्रामपंचायत पगारवाढ, बोनस, इतर सुविधा पुरवीत असते. मात्र, त्याच वेळी कामगारांनीही आपली जबाबदारी ओळखून नागरिकांची सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. सरपंच कल्पना गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी कर्मचाºयांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच कर्मचाºयांनी गावाच्या विकासासाठी शंभर टक्के योगदान दिल्यास गावाचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. या वेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक फडतरे, दत्तात्रय फडतरे व सुरेश भांडवलकर यांनी कर्मचाºयांना डबल बोनस देऊन दिवाळी गोड केल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत कर्मचाºयांनाही बोलावून समस्या जाणून घेण्याची पद्धत सुरू करण्याची मागणी केली.

चांगल्या कर्मचा-यांना ट्रीपल बोनस देणार
ग्रामपंचायत कर्मचा-यांनी त्यांच्या कामाच्या शंभर टक्के योगदान दिल्यास नागरिकांच्या सर्व समस्या सुटण्यास मदत होणार असल्याने पुढील वर्षापासून उत्कृष्ट काम करणाºया कामगारांना ट्रीपल बोनस देणार असल्याचे माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे यांनी सांगितले.

Web Title:  The employees of the Koregaon double-digit Diwali, a thirteenth-floor incremental increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे