पिंपरी - शासकीय अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थेच्या विस्तारीकरणास पिंपरी-चिंचवडमधील चिखली नजीकच्या जागेचा पर्याय पुढे आला. काही दिवसांतच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याने या जागेवर डोळा ठेवलेल्यांनी रात्रीत भूखंडांची आखणी झाली. झोपड्याही अवघ्या काही तासांत उभ्या राहिल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पथक तातडीने अतिक्रमण नियंत्रणासाठी गेले. परंतु धार्मिक स्थळांवर कारवाई होऊ देणार नाही, अशी काहींनी आक्रमक भूमिका घेतल्याने तेथे दिवसभर तणावाची परिस्थिती होती. पोलीस फौजफाटा पाठवून दिल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली.चिखली, जाधववाडी येथील पेठ क्रमांक १३ व १४ येथे प्राधिकरणाचा मोकळा भूखंड आहे. पूर्वी ती गायरानाची जागा होती. त्या जागेचा ताबा सध्या पिंपरी महापालिकेकडे असून, जागा प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र ही जागा बळकावण्याचा आगोदरपासूनच काहींचा डाव होता. त्यांनी या जागेवर अतिक्रमण व्हावे, यादृष्टीने नियोजन केले होते. ही जागा शासकीय अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थेला विस्तारीकरणासाठी देण्यासंदर्भात निर्णय झाला. ही जागा शासकीय अभियांत्रिकी संस्थेला दिली जाणार हे लक्षात येताच, या जागेवर लोकवस्ती आहे, येथील भूखंड विक्री झाले आहेत. हे भासविण्याचा प्रयत्न झाला. गायरान जागा आहे, स्वस्तात भूखंड घ्या, असे पसरविल्याने रविवारी दिवसभर या परिसरात भूखंडाचा ताबा घेण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. रविवारी रात्रीपर्यंत भूखंडांची आखणी करण्याचे काम सुरू होते. भूखंडांचा ताबा घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. या प्रकाराबद्दल सुजान नागरिकाने प्राधिकरणाच्या अधिकाºयांना कळविले. सोमवारी सकाळी प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बेकायदापणे भूखंडांची आखणी करणाºयांना हटकले. कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगितले.चिखली, जाधववाडी येथील सेक्टर क्रमांक १३ व १४ येथे प्राधिकरणाचा मोकळा भूखंड आहे. पूर्वी ती गायरानाची जागा होती. त्याचा ताबा सध्या पिंपरी महापालिकेकडे असून, प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भूखंडावर मार्किंग करून एका-एका गुठ्यांचे प्लॉट करण्यात आले होते. त्याच्या बाजूला दगड रचण्यात आले होते. हा प्रकार आम्हाला समजल्यानंतर अधिकाºयांनी जाऊन ते दगड काढून टाकले आहेत. तसेच भूखंडावरील झोपड्यादेखील हटविल्या आहेत. प्लॉटिंग करणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे़- सतीश खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरणआणि निवळला तणावनागरिकांच्या भावना दुखवू नये, धार्मिक स्थळांना पर्यायी जागा द्यावी, तोपर्यंत येथील धार्मिकस्थळांवर कारवाई होऊ देणार नाही, अशी आग्रही मागणी तेथे जमलेल्या जमावाकडून होऊ लागली. तणावाची परिस्थिती वाढत गेली. त्यामुळे पोलिसांची जादा कुमक, तसेच राज्य राखीव दलाचे पोलीस तेथे पाठविण्यात आले. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली.
तासांतच उभारल्या झोपड्या, प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:55 AM