पुणे: कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी सांगितले. काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना राऊत म्हणाले, या सगळ्या चूका राज्यातील मागील वेळच्या भाजपा सरकारच्या आहेत. त्यांचे माजी मंत्री आता मिस मँनेजमेंट म्हणून आमच्यावर टीका करत असतील, पण खरी मिस मँनेजमेंट त्यांचीच होती. त्यांनी सरकारी संस्था, तसेच ग्रामपंचायती यांच्याकडून थकीत वीज बिलांची वसूलीच केली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.कोळसा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण अतिवृष्टी, अचानक मागणी वाढणे यामुळे शिल्लक साठा संपला. पावसाने कोळसा कमी झाला. तरीही आमचे अधिकारी शोध घेत आहेत. विलासपूरला महानदी प्रकल्पात कोळसा आहे असे समजले असून अधिकारी तिकडे गेले आहे अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.
'...कशी तुझी जिरवली आता भर शंभरचं!'
आर्थिक अडचणी असल्याचे मान्य करून डॉ. राऊत म्हणाले, महानिर्मितीला कोळसा खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. ते महावितरणकडून मिळतात. महावितरणची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे यातून ग्राहकच खरा मार्ग काढू शकतात, त्यांनी थकीत वीजबिले त्वरीत भरावीत असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.