किल्ले बनवा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:53 AM2018-11-14T00:53:26+5:302018-11-14T00:53:55+5:30

किल्ले बनवा स्पर्धा : प्रतापगड, राजगड, देवगिरी ठरले आकर्षण; विजेत्यांना पारितोषिक

Enjoy the faces of students due to the competition for the castle | किल्ले बनवा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

किल्ले बनवा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

Next

लोणावळा : किल्ले बनवा स्पर्धेमध्ये प्रतापगड, राजगड व देवगिरी किल्ला यांच्या प्रतिकृती सर्वोत्कृष्ट ठरल्या. मोठ्या गटांमध्ये तरुण मराठा मित्र मंडळ व विजय ढाकोळ ग्रुप यांनी, तर लहान गटात हनुमान मित्र मंडळ व शिवजन्मोत्सव मंडळे यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळविला. श्री योद्धा प्रतिष्ठान मित्रमंडळ व बापूसाहेब भेगडे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन केले होते. विविध मंडळांनी केलेल्या कौतुकामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.

संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते या किल्ला स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. या वेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी, कॉँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. किरण गायकवाड, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, मनसे अध्यक्ष भारत चिकणे, नगरसेवक भरत हारपुडे, निखिल कविश्वर, सेजल परमार, कैलास गायकवाड, योद्धा प्रतिष्ठानाचे संस्थापक रुपेश नांदवटे, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, पोलीस पाटील सदाशिव सोनार, बाबाजी कुटे, हरीश कोकरे, बाळासाहेब फाटक, विनय विद्वांस, डॉ. सीमा शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल : लहान गट : प्रथम क्रमांक - हनुमान मित्रमंडळ, कुसगाव बु.(देवगिरी) व शिवजन्मोत्सव मंडळ, ठोंबरेवाडी (राजगड), द्वितीय क्रमांक - तरुण मराठा मंडळ गावठाण (राजगड) व शिवबा ग्रुप, तुंगार्ली (राजगड), तृतीय क्रमांक - श्रीमंत योगी मित्रमंडळ बारा बंगला (सिंहगड) व आरसीसी रायवूड ग्रुप रायवूड (प्रतापगड) तर उत्तेजनार्थ म्हणून श्रीराम गवळीवाडा (राजगड) व शिवदुर्ग क्लायंबर ग्रुप नांगरगाव (राजगड) यांना बक्षिसे देण्यात आली.

मोठा गट - प्रथम क्रमांक - तरुण मराठा मंडळ गावठाण (प्रतापगड) व विजय ढाकोळ ग्रुप खंडाळा (राजगड), द्वितीय क्रमांक - बापुअण्णा भेगडे युवा मंच नांगरगाव (कोराईगड) व अमित आर्ट, आकुर्डी (रायगड), तृतीय क्रमांक - श्री स्वामी समर्थ नांगरगाव (प्रतापगड) व तुंगार्ली ग्रामस्थ (कोराईगड), उत्तेजनार्थ - छत्रपती ग्रुप सदापूर (राजमाची) व विद्यार्थ्यांना छावा ग्रुप बोरज (तिकोना) यासह डी.पी.मेहता ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी माऊली मोहिते याने एकट्याने दीड दिवसात साकारलेल्या तोरणा किल्ल्याला विशेष बक्षीस देण्यात आले. कुसगाव-भैरवनाथनगर संघाला उत्कृष्ट किल्ला बनविल्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गैरविण्यात आले.

कार्ला येथील स्पर्धेत संत रोहिदास मंडळ प्रथम

कार्ला येथे श्री शिवशंकर तरुण
मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत संत रोहिदास तरुण मंडळाचा प्रथम क्रमांक आला़ तर, द्वितीय क्रमांक जय महाराष्ट्र ग्रुपने मिळविला. तर तृतीय क्रमांक एकवीरा क्रिकेट क्लब व यज्ञ हुलावळे यांनी पटकाविला, तर रांगोळी स्पर्धेत मोनिका भरत हुलावळे व मोहिनी जंगम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक मेघा हुलावळे व सायली सुरेश जाधव यांनी तर, तृतीय क्रमांक सुवर्णा रोहिदास शिर्के व ऐश्वर्या दत्ता दळवी यांनी पटकाविला.

स्पर्धेमध्ये १६ जणांनी किल्ले स्पर्धेत भाग घेतला. तर रांगोळी स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. दोन्ही स्पर्धेतील स्पर्धकांना शरदराव हुलावळे, अश्विनी हुलावळे, अविनाश हुलावळे, नंदाताई हुलावळे, संजय मोरे, रूपाली हुलावळे यांचा वतीने रोख बक्षीस व शिवशंकर मंडळ, कैलास हुलावळे, कुमार हुलावळे यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सतीश मोरे व गणेश हुलावळे, दिलीप हुलावळे, भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले़

या दोन्ही स्पर्धेचे आयोजन व स्पर्धा पार पाडण्यासाठी दिलीप हुलावळे, संजय हुलावळे, भाऊसाहेब हुलावळे, राजू हुलावळे, रोहिदास शिर्के, मितीश हुलावळे, कुमार हुलावळे, कैलास हुलावळे, संभाजी हुलावळे, विशाल भाऊ हुलावळे, सचिन हुलावळे, अनिल हुलावळे, विशाल वसंत हुलावळे, सचिन हुलावळे, नीलेश शिर्के, गणेश हुलावळे यांनी परिश्रम घेतले. भाऊसाहेब हुलावळे व मितिष हुलावळे यांनी सूत्रसंचालन केले़ कुमार हुलावळे यांनी आभार मानले.
 

Web Title: Enjoy the faces of students due to the competition for the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे