करमणूक कर विभागाला फटका
By admin | Published: April 17, 2016 03:00 AM2016-04-17T03:00:15+5:302016-04-17T03:00:15+5:30
पुण्यातील गहुंजे येथे होणारे आयपीएल क्रिकेटचे सामने रद्द झाल्याने प्रशासनाला सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.
पुणे: पुण्यातील गहुंजे येथे होणारे आयपीएल क्रिकेटचे सामने रद्द झाल्याने प्रशासनाला सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.
पुण्यात होणाऱ्या सात सामन्यांसाठी आयपीएलच्या आयोजकांनी करमणूक कर विभागाकडे ४ कोटी ८० लाख रुपयांचा कर जमा केला होता. परंतु आता केवळ तीनच सामने पुण्यात होणार असल्याने प्रशासनाला १ कोटी ९५ लाख रुपयांचा कर मिळणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यादरम्यान होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी महाराष्ट्रात होणारे सामने रद्द
करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पुण्यामध्ये साखळी सामन्यासह क्वालिफायर आणि एलिमिनेटर असे एकूण सात सामने होणार होते. एका सामन्यासाठी शासनाच्या नियमानुसार ६५ लाख रुपयांचा असा सात सामन्यांसाठी एकूण ४ कोटी ८० लाख रुपयांचा कर करमणूक कर जमा केला होता. मात्र, सामने रद्द झाल्याने जमा केलेला निधी आयपीएलच्या आयोजकांना परत करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.