पूजा महागली तरी खरेदीचा उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:15 AM2021-09-05T04:15:08+5:302021-09-05T04:15:08+5:30

गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे आनंद, उत्साह आणि धार्मिक विधी-पूजांची रेलचेल. त्यामुळे गणपत्ती बाप्पांच्या घरी किंवा मंडळात येण्याआधी त्याच्या स्वागतासाठी ...

Even though pooja is expensive, the enthusiasm for shopping remains | पूजा महागली तरी खरेदीचा उत्साह कायम

पूजा महागली तरी खरेदीचा उत्साह कायम

Next

गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे आनंद, उत्साह आणि धार्मिक विधी-पूजांची रेलचेल. त्यामुळे गणपत्ती बाप्पांच्या घरी किंवा मंडळात येण्याआधी त्याच्या स्वागतासाठी जशी सजावटीची तयारी होते तशीच त्याच्या विधीवत प्रतिष्ठापनेसाठी आणि रोजच्या पूजेसाठीच्या साहित्यासाठीची खरेदीसुद्धा सुरू होते. पूजा साहित्याचे प्रसिद्ध दुकानदार ए. व्ही. काळे येथील संचालकांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारामध्ये गणेश प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे पॅकेज बॉक्स बाजारात दाखल झाले आहेत. सुमारे ४०० ते पाचशे रुपयांपर्यंत असलेल्या या पॅकेजमध्ये हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, शेंदूर, कापूर, जानवी, उदबत्ती, अत्तर, पाच सुपारी, खारीक, बदाम, कापूस वस्त्र, फुलवात, समईवात, रांगोळी मध अशा सोळा वस्तू असतात. ज्यामुळे गणेशाची प्रतिष्ठापना करताना वस्तूंसाठी ऐनवेळी धावपळ होत नाही. गणेशोत्सवात घालण्यात येणाऱ्या सत्यनारायण पूजेचे किट्ससुद्धा उपलब्ध असून त्यामध्ये सुपारींची संख्या अधिक असल्यामुळे त्याची किंमत अधिक आहे.

कोकणातील अतिवृष्टीमुळे यंदा कोकणातून येणाऱ्या सुपारीची किमती भलतीच महागली आहे. ४००-४५० रुपये किलोने मिळणारी सुपारी यंदा बाजारात ५०० रुपये किलो झाली आहे. लोकल व मोठा ब्रॅण्ड असलेल्या उदबत्तीमध्ये मात्र किंचीत वाढ झाली आहे. तर वस्त्रमाळ, आसन, धूप आदीच्या किमती मात्र स्थिर आहेत.

---

चौकट

पंचवट व दशांग यंदाची उदबत्ती खासीयत

--

पूजेच्या प्रसन्नतेचा फील देणारी पुजेतील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे उदबत्ती. उदबत्तीचा गंध सगळ्यांनाच हवाहवासा असतो आणि अत्तर किंवा परफ्युमप्रमाणे एकाच गंधाची उदबत्ती ग्राहक कधीच मागत नाहीत तर प्रत्येकवेळी नवा सुगंधाची डिमांड असते. त्यामुळे यंदाही बाजारात मोगरा, केवडा, केशरचंदन, पारिजातक, हिना, लिवेंडर अशा विविध गंधाच्या उदबत्ती उपलब्ध आहेतच त्यामध्ये यंदा नावीन्य आले ते दशांश आणि पंचवटी या उदबत्तींचे. दशांश उदबत्तीमध्ये दहा प्रकारचे धूप एकत्र केले आहे त्यामुळे धूप आणि उदबत्तीचे कॉम्बीनेशन या उदबत्तीत झाले असून उदबत्तीचा गंध आणि धूपचा धूर एकत्र मिळणार आहे. पंचवटीमध्ये उद आणि लोबण या दोन्हीसाठी लागणारे घटक एकत्र केले असून त्यामुळे त्याचा फीलही वेगळा असणार आहे.

----

कोट -

कोट १९५६ सालापासून आमचा व्यवसास सुरू आहे. देवाच्या पूजेचे दर्जेदार साहित्य आम्ही ठेवत असल्यामुळे आम्हाला आजपर्यंत कधीच कोणत्याच वर्षी तोटा झाल्याचे आठवत नाही. गेल्या वर्षी व यावर्षीच्या लॉकडाऊनमध्येही तोच अनुभव आहे. देवाची पूजा हा लोकांच्या श्रध्देचा विषय आहे आणि जिथे श्रद्धा असते तेथे तडजोड नसते त्यामुळे नागरिकांकडून पूजा साहित्य खरेदी करण्यामध्ये यंदाही दरवर्षी सारखाच उत्साह दिसतो. यंदा आमच्या कल्याणी ब्रॅण्डमध्ये जीवन बॅलेन्स, कल्याणी स्टार, इनक्रेडेबल या अगरबत्तींना अधिक मागणी आहे.

- सोहन ओस्वाल ( व्ही. पी. कल्याणी, अगरबत्ती) (फोटो ०४ सोहन ओस्वाल)

----

कोट

आमच्या दुकानातील धूप व अगरबत्ती चिंतन दशांग साम्राणी या धूप याला जास्त चिंतन कवडी लोबाण धूप कप याला मोठी मागणी.

महागाई झाली आहे पण मार्केट परिस्थितीमुळे जास्त भाववाढ केली नाही. जेणेकरून आधीच लॉकडाऊनमध्ये अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि विघ्नहर्त्याची पूजा घराघरात उत्साहात व्हावी यासाठी आम्ही पूजेच्या साहित्याचे दर वाढविले नाहीत. लॉकडाऊन आणि महागाईचा परिणाम बाजारावर आहे मात्र तरी गर्दी हळूहळू वाढते आहे. पूजेमध्ये लोक तडजोड करत नाहीत हेच पुन्हा दिसत आहे.

- बिलाल अतार, गुडलक परफ्युमर्स आणि अगरबत्ती (फोटो ०४बिलाल अतार)

---

फोटो क्रमांक :०४ पूजा साहित्य दुकान-०१

०४ पूजा साहित्य दुकान-०२

Web Title: Even though pooja is expensive, the enthusiasm for shopping remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.