उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सहारा फाउंडेशनचे बारामती अध्यक्ष परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद यांच्यावतीने महिला सशक्तीकरण उपक्रमातून ६२ गरजू व होतकरू महिलांना पवार यांच्या हस्ते शिलाई मशीन वितरण करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, विविध सामाजिक कार्यक्रम सहारा फाउंडेशन राबवित आले आहे. पवार फाउंडेशन आणि विद्या प्रतिष्ठान देखील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असल्याचे पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दि मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. पी. ए. इनामदार यांनी सहारा फाउंडेशनच्या वतीने राबविलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मनोगत व्यक्त करताना सांगितले. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष हाजी सोहेल खान, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, सत्यव्रत काळे, उद्योजक फखरुद्दीन कायमखानी, नगरसेविका तरन्नुम सय्यद, बारामती बँकेचे व्हा. चेअरमन अविनाश लगड, संचालक शिरीष कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, मुस्लिम बँकेचे व्हा. चेअरमन अलीरजा इनामदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परवेज सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन आलताफ सय्यद यांनी केले.
अजित पवार यांच्या हस्ते शिलाई मशीन वितरण करण्यात आले.
२१०८२०२१ बारामती—०७