खोदकामात मिळणाऱ्या खडकाची फरशी होणार, मेट्रोचे रिसायकलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:15 AM2018-03-20T03:15:25+5:302018-03-20T03:15:25+5:30
मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार करताना खोदण्यात येणाºया खडकाची फरशी तयार करून ती मेट्रो स्थानकांच्या जमीन व भिंतींसाठी वापरण्यात येणार आहे. खोदकामातून निघणाºया नैसर्गिक संपदेचा असा वापर करून रिसायकलिंग करण्याचा मेट्रोचा हा प्रयत्न आहे.
पुणे : मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार करताना खोदण्यात येणाºया खडकाची फरशी तयार करून ती मेट्रो स्थानकांच्या जमीन व भिंतींसाठी वापरण्यात येणार आहे. खोदकामातून निघणाºया नैसर्गिक संपदेचा असा वापर करून रिसायकलिंग करण्याचा मेट्रोचा हा प्रयत्न आहे.
मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारीमार्गाचे काम येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठीच्या प्राथमिक चाचण्या करण्यात येत आहेत. त्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सोमवारी मेट्रो कार्यालयात दिली. प्राथमिक चाचणीत अत्यंत टणक असा खडक लागला आहे. मेट्रोचा हा भुयारीमार्ग शहराच्या मध्यभागातून जातो. तो जमिनीखाली तब्बल २५ ते ३० मीटर असणार आहे. त्यामुळे टणक खडक खोदूनच तो करावा लागणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे.
या खडकाचा उपयोग काय करायचा? याचा विचार सुरू असतानाच तज्ज्ञांच्या समितीने खडक व्यवस्थित निघाला तर त्याची फरशी करून त्याचा वापर करता येणे शक्य आहे असे स्पष्ट केले. त्यामुळेच मेट्रो कंपनीने तसा विचार केला आहे. खडक भुगा होऊन निघाला तर हे करणे शक्य नाही, मात्र तज्ज्ञांच्या मते खडकाचे मोठे तुकडेच निघतील. तसे झाल्यास त्याचा फरशीसाठी वापर करता येणे सहज शक्य आहे, असे दीक्षित म्हणाले.
- भुयारीकामात बराच राडारोडा निघणार आहे. मात्र महामेट्रो तो कुठेही टाकणार नाही, तर त्याचा योग्य तो विनियोग केला जाईल. आधुनिक तंत्रांचा वापर करून त्याचा विटा तसेच अन्य बांधकाम साहित्य तयार करण्यासाठीही वापर करण्यात येईल, असे दीक्षित यांनी सांगितले.