अनुभवला युद्धाचा थरार

By admin | Published: March 8, 2016 01:32 AM2016-03-08T01:32:30+5:302016-03-08T01:32:30+5:30

एखाद्या गावाचा दहशतवाद्यांनी घेतलेला ताबा... त्यांच्याशी सामना करण्यासाठी जवानांनी अवलंबलेली युद्धनीती... यासाठी हेलिकॉप्टर, रणगाडे आणि वाहनांतून सैन्याने केलेले आगमन

Experience the Thunder of War | अनुभवला युद्धाचा थरार

अनुभवला युद्धाचा थरार

Next

पुणे : एखाद्या गावाचा दहशतवाद्यांनी घेतलेला ताबा... त्यांच्याशी सामना करण्यासाठी जवानांनी अवलंबलेली युद्धनीती... यासाठी हेलिकॉप्टर, रणगाडे आणि वाहनांतून सैन्याने केलेले आगमन... आणि गावकऱ्यांवरील होत असणारे आक्रमण परतवून लावताना जवानांनी दिलेला धाडसी लढा... असा युद्धाचा थरार सोमवारी अनुभवायला मिळाला. निमित्त होते सध्या पुण्यात चालू असलेल्या एक्सरसाईज फोर्स १८ या आंतरराष्ट्रीय सराव मोहिमेचे.
पुण्यातील औंध लष्करी तळावर गेले सहा दिवस सुरू असलेल्या या संयुक्त सरावाचे प्रात्यक्षिक विविध देशांचे निरीक्षक व माध्यम प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आले. यामध्ये सरावात सहभागी झालेल्या सर्व देशांचे जवान सहभागी झाले होते. या सरावामध्ये संयुक्त राष्ट्रांची शांतता मोहीम आणि भूसुरुंग नष्ट करण्याचा सराव करण्यात आला. या वेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करत जागतिक शांततेसाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजविरोधी घटकांशी लढण्यासाठी तयार असल्याचे दाखविण्यात आले.
एक लष्करी ठाणे निश्चित केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गस्त ठेवून शांतता प्रस्थापित करण्याचे काम ही तुकडी करते. तुकडीच्या कमांडरच्या नेतृत्वाखाली जवान युद्धनीती वापरून दहशतवाद्यांचा बीमोड करतात. यासाठी विविध युद्धतंत्रांचा वापर केला जातो. यादरम्यान स्थानिकांकडून लष्कराला होणारा विरोध आणि त्यांच्याशी यशस्वी बोलणी केल्यानंतर निघालेला मार्ग याचे अतिशय उत्तम पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. या सर्व प्रात्यक्षिकांसाठी औंध मिलिटरी कॅम्प येथे असलेल्या जागेमध्ये पीस किपिंग आॅपरेशनसाठी आवश्यक अशी युद्धभूमी तयार करण्यात आली होती.

Web Title: Experience the Thunder of War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.