शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

अनुभवला युद्धाचा थरार

By admin | Published: March 08, 2016 1:32 AM

एखाद्या गावाचा दहशतवाद्यांनी घेतलेला ताबा... त्यांच्याशी सामना करण्यासाठी जवानांनी अवलंबलेली युद्धनीती... यासाठी हेलिकॉप्टर, रणगाडे आणि वाहनांतून सैन्याने केलेले आगमन

पुणे : एखाद्या गावाचा दहशतवाद्यांनी घेतलेला ताबा... त्यांच्याशी सामना करण्यासाठी जवानांनी अवलंबलेली युद्धनीती... यासाठी हेलिकॉप्टर, रणगाडे आणि वाहनांतून सैन्याने केलेले आगमन... आणि गावकऱ्यांवरील होत असणारे आक्रमण परतवून लावताना जवानांनी दिलेला धाडसी लढा... असा युद्धाचा थरार सोमवारी अनुभवायला मिळाला. निमित्त होते सध्या पुण्यात चालू असलेल्या एक्सरसाईज फोर्स १८ या आंतरराष्ट्रीय सराव मोहिमेचे. पुण्यातील औंध लष्करी तळावर गेले सहा दिवस सुरू असलेल्या या संयुक्त सरावाचे प्रात्यक्षिक विविध देशांचे निरीक्षक व माध्यम प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आले. यामध्ये सरावात सहभागी झालेल्या सर्व देशांचे जवान सहभागी झाले होते. या सरावामध्ये संयुक्त राष्ट्रांची शांतता मोहीम आणि भूसुरुंग नष्ट करण्याचा सराव करण्यात आला. या वेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करत जागतिक शांततेसाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजविरोधी घटकांशी लढण्यासाठी तयार असल्याचे दाखविण्यात आले. एक लष्करी ठाणे निश्चित केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गस्त ठेवून शांतता प्रस्थापित करण्याचे काम ही तुकडी करते. तुकडीच्या कमांडरच्या नेतृत्वाखाली जवान युद्धनीती वापरून दहशतवाद्यांचा बीमोड करतात. यासाठी विविध युद्धतंत्रांचा वापर केला जातो. यादरम्यान स्थानिकांकडून लष्कराला होणारा विरोध आणि त्यांच्याशी यशस्वी बोलणी केल्यानंतर निघालेला मार्ग याचे अतिशय उत्तम पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. या सर्व प्रात्यक्षिकांसाठी औंध मिलिटरी कॅम्प येथे असलेल्या जागेमध्ये पीस किपिंग आॅपरेशनसाठी आवश्यक अशी युद्धभूमी तयार करण्यात आली होती.