राज्यातील शेतकरी कर्जमाफीची रक्कम भरण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:03 PM2018-09-29T16:03:47+5:302018-09-29T16:03:57+5:30

शेतक-यांना येत्या १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत रक्कम भरता येणार आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाने यापूर्वी वेळोवेळी अध्यादेश काढले आहेत.

Extension to loan payment clear of farmers | राज्यातील शेतकरी कर्जमाफीची रक्कम भरण्यास मुदतवाढ

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची रक्कम भरण्यास मुदतवाढ

Next

पुणे: राज्यातील सततचा दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविल्या जात असलेल्या ‘छत्रपत्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ राबविली जात आहे.या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांना एकवेळ समझोता  (वन टाईम सेटल्मेंट) या योजनेचा लाभ घेण्यासाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजनेंनुसार (वन टाईम सेटल्मेंट) पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम ३० सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करण्यास मुदत देण्यात आली होती.ही मुदत संपल्यामुळे शेतक-यांना रक्कम भरण्यास मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शेतक-यांना येत्या १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत रक्कम भरता येणार आहे.शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाने यापूर्वी वेळोवेळी अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार व पणन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Extension to loan payment clear of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.