पुणे : जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा तीनपैकी एक आराकडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगर पालिकेकडे पाठविण्यात आला आहे. इमारतीसाठी सधारण १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित इमारतीमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी दोन मजले राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यात सुमारे ४ हजार दुचाकी लावता येवू शकतील. तर ४०० चारचाकी वाहनांसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. १४ कोर्ट हॉल, महिला व पुरुष वकिलांसाठी २ हजार चौरस फुट बार रुम, १ हजार चौसस फुट कॅन्टीन, ७०० आणि ३५० व्यक्ती बसू शकतात अशा शमतेचे दोन हॉल, पोलीस चौकीसाठी जागा, पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहे व आवश्यक सर्व बाबींचा या इमारतीमध्ये समावेश असणार आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, पुणे बार असोसिएशनची कार्यकारणी, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत तीनपैकी एक आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सध्या तो पालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पुर्व झाल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार यांनी दिली. नवीन इमारतीमुळे न्यायालयात भेडसावणारी कोर्टरुम आणि पार्किंगची कमी आता दूर होणार आहे. न्यायालयातील पोलीस चौकी ते पुणे बार असोसिएशनच्या कॅन्टीनपर्यंतच्या जागेत नवीन एल शेप उभारण्यात येईल. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न्यायालय प्रशासनाकडून पाहणी देखील करण्यात आली होती. सध्या न्यायालयत १० हजार ८० चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम करता येवू शकते. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या १.५ एफएसआय नियमानुसार १५ हजार १२० चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकते, असे अॅड. पावर यांनी सांगितले. ४० हजार चौरस मीटर बांधकाम शक्य :भविष्यात पुणे मेट्रोमुळे एफएसआय वाढवून मिळाल्यास अतिरिक्तचे बांधकाम करणे शक्य आहे. बांधकामासाठी पाहणी करण्यात आलेली जागा मेट्रोच्या स्टेशनपासून ५०० मीटरच्या अंतरात आहे. मेट्रोअॅक्टनुसार ५०० मीटरपर्यंत जागेवर बांधकाम करण्यासाठी ४ एफएसआय मिळतो. त्यामुळे या ठिकाणी एकूण ४० हजार ३२० चौरस मीटर बांधकाम करणे शक्य आहे. निवड करण्यात आलेला आराखडा हा ४ एफएसआयप्रमाणे तयार करण्यात आला आहे.
पुणे न्यायालयाचा विस्तार :नवीन इमारतीचा आराखडा निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 3:52 PM
जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा तीनपैकी एक आराकडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगर पालिकेकडे पाठविण्यात आला आहे.
ठळक मुद्देबराकीच्या ठिकाणी उभारण्यात येणार प्रशस्त बिल्डींग, पार्किंगची समस्या मिटणार