पुणे : फेसबुक फ्रेंडने पाठविलेल्या गिफ्टमध्ये सोने सापडल्याचे भासवून एका महिला शिक्षिकेची ३ लाख रुपयांची फसवणूक केली़. याप्रकरणी येरवडा येथील ३२ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी अमर सिंग, अश्फाक खान, अमिना खान असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार १९ सप्टेंबर २०१६ ते २३ जानेवारी २०१७ दरम्यान या महिलेच्या घरी येरवडा येथे घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला वडगाव शेरी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत़. अमिना खान नावाच्या महिलेने या शिक्षकेला फेसबुक अकाऊंटवर फ्रेंड सिक्वेस्ट पाठविली़. ती स्वीकारल्यानंतर तिने आपण इंग्लडला राहत असून परदेशातून गिफ्टचे पार्सल पाठविण्याचे आमिष दाखविले़. हे पार्सल घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर फोन करुन २७ हजार रुपये एका बँक खात्यावर भरायला सांगितले़. त्याप्रमाणे त्यांनी पैसे भरले़ . त्यानंतर त्यांना एका महिलेने फोन करुन तुमच्या पार्सलमध्ये सोने व इंग्लडचे चलन पाऊंड सापडले आहेत़.त्याची पेनल्टी भरावी लागेल, असे सांगून त्यांना ३ लाख २ हजार रुपये आॅनलाईनद्वारे भरायला सांगितले़. त्यानंतर त्यांनी मोबाईलवर संपर्क साधल्यावर तो बंद असल्याचे लक्षात आले़. त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत़.
फेसबुक फ्रेंडने केली महिला शिक्षिकेची ३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 8:41 PM
आपण इंग्लडला राहत असून परदेशातून गिफ्टचे पार्सल पाठविण्याचे आमिष दाखविले़. हे पार्सल घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर फोन करुन २७ हजार रुपये एका बँक खात्यावर भरायला सांगितले़. त्याप्रमाणे त्यांनी पैसे भरले़ .
ठळक मुद्देतक्रारदार महिला वडगाव शेरी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका