फॅमिली कोर्टात आढळले कुंकू टाकून अर्धवट कापलेले लिंबू : जादूटोण्याच्या प्रकाराने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:50 PM2019-09-13T21:50:20+5:302019-09-13T21:53:27+5:30

पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्या मजल्यावर कुंकवाने भरलेले लिंबू फेकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Family court found case of jadu tona | फॅमिली कोर्टात आढळले कुंकू टाकून अर्धवट कापलेले लिंबू : जादूटोण्याच्या प्रकाराने आश्चर्य

फॅमिली कोर्टात आढळले कुंकू टाकून अर्धवट कापलेले लिंबू : जादूटोण्याच्या प्रकाराने आश्चर्य

Next
ठळक मुद्दे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची असोसिएशनची मागणीसीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतरच प्रकार येईल उघडीस

पुणे :  पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्या मजल्यावर कुंकवाने भरलेले लिंबू फेकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच असा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. 
सध्या याप्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतरच हा प्रकार उघडीस येईल. न्यायालयात अर्धवट कापून कुंकु लावलेले लिंबु टाकणे हा विचित्र प्रकार आहे. याबाबत चौकशी करून संबंधीतावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.  शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नी, मुलांचा ताबा, आई वडीलांकडून मुलांकडे होणाऱ्या पोटगीची मागणी अशा प्रकारचे खटले दाखल होतात आणि निकालही  लागतात. मात्र खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी विविध कल्पना लढवून पती-पती एकमेकांच्या अडचणीत वाढ करतानाही आढळतात. निकाल आपल्या बाजूने लागण्याकरिता पक्षकार अघोरी प्रथेचा म्हणचे उतारा टाकण्याचा प्रकार करत असतात असाच प्रकार यापूर्वी जुन्या कौटुंबिक न्यायालयात घडल्याचे वकीलांकडून सांगण्यात आले.  परंतु, कौटुंबिक न्यायालयात जेव्हापासून शिवाजीनगर येथील नवीन इमारतीत सुरू झाल्यापासून घडलेला हा पहिलाच प्रकार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रथमदर्शनी जादूटोण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून आले असून याबाबत न्यायालयीन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दिवसभर लिंबू त्याच ठिकाणी पडल्याचे त्यांना आढळले. न्यायालयीन सीसीटिव्ही तपासूनच कोणी हा प्रकार केला याबाबत माहिती कळण्यास मदत होईल असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Family court found case of jadu tona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.