Pune Crime: वेल्हे तालुक्यात शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:51 PM2022-03-15T13:51:53+5:302022-03-15T13:52:05+5:30

हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Farmer brother killed his brother in a farm dispute in Velhe taluka | Pune Crime: वेल्हे तालुक्यात शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून

Pune Crime: वेल्हे तालुक्यात शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून

Next

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील सोंडे माथना येथील किसन निवृ्ती किन्हाळे (वय 50,राहणार सोंडे माथना) शेतक-याचा शेताच्या वादातून खून झाला असून विनायक रामदास किन्हाळे (वय 39,राहणार सोंडे माथना) यास अटक करण्यात आल्याची माहिती वेल्हे पोलीसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडे माथना येथील शेतकरी किसन निवृ्ती किन्हाळे (वय 50) हा गुंजवणी नदीच्या तिरावरुरन घरी परतत असताना विनायक किन्हाळे यांनी त्यांच्यावर लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. जखमी झाल्याने त्यास भोर तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करण्यापुर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॅाक्टरांनी सांगितले,
याप्रकरणी वेल्हे पोलीसांनी  विनायक रामदास किन्हाळे (वय 39) यास अटक केली असुन भादवी 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

किसन निवृ्ती किन्हाळे हे तंटामुक्त गाव समिती सोंडेमाथना चे अध्यक्ष होते,तर तोरणासागर विद्यालय निवीचे प्राचार्य मोहन किन्हाळे यांचे ते भाऊ आहेत. गेल्या दिवसापासून किन्हाळे भाऊकीचा आपआपसात वाद होता. सोंडे माथना परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम बांदल,औंदुबर आडवाल,विशाल मोरे,अभय बर्गे अजय साळुंखे,यांचे पथक गावात गस्त घालत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. व परिस्थितीची पाहणी केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Farmer brother killed his brother in a farm dispute in Velhe taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.