शेतकरी पती - पत्नीस डांबून मारहाण, १ लाख ३५ रुपयांचे कोंबडखादय भरून नेल्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:14 AM2021-07-14T04:14:54+5:302021-07-14T04:14:54+5:30

यासंदर्भात शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश साळुंखे हे आपल्या पत्नीसह निमोणे लगत दुर्गेवस्ती येथील कॅनॉलच्या शेजारी राहतात. त्यांचा ...

Farmer husband and wife beaten up, Rs 1 lakh 35 worth of chicken feed taken away | शेतकरी पती - पत्नीस डांबून मारहाण, १ लाख ३५ रुपयांचे कोंबडखादय भरून नेल्याचा प्रकार

शेतकरी पती - पत्नीस डांबून मारहाण, १ लाख ३५ रुपयांचे कोंबडखादय भरून नेल्याचा प्रकार

Next

यासंदर्भात शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश साळुंखे हे आपल्या पत्नीसह निमोणे लगत दुर्गेवस्ती येथील कॅनॉलच्या शेजारी राहतात. त्यांचा शेतीबरोबरच पोल्ट्री व्यवसाय आहे .एक महिन्यापुर्वी त्यांनी अजय जवळकर याच्याकडुन कोंबड्यांसाठी खाद्य आणले होते . परंतु त्याचे काही पैसे देणे बाकी होते. बुधवार (दि .८) रोजी दुपारी ४:३० वाजता दोन व्यक्तीसह पैसे मागण्यासाठी आला. त्यावेळी सुरेश साळुंखे यांनी आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत नंतर देतो असे सांगितले. यावेळी अजय जवळकर याने तुम्ही पैसे कसे देत नाहीत तेच बघतो असे म्हणत दमदाटी केली आणि निघून गेला.

त्यानंतर रात्री ११:३० च्या सुमारास जवळकर हा त्याच्या १० ते १५ साथीदारांसह पुन्हा साळुंखे यांच्या घरी आला. त्यानंतर त्याने त्याच्या २ ते ३ साथीदारांसह पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या गंगाराम अकोलकर यास मारहाण केली. यावेळेस त्या सर्वांच्या हातात काठ्या व तलवार होती. त्यांचा आरडाओरडा ऐकुन साळुंखे यांची पत्नी बाहेर आली. यावेळेस जवळकर याने त्यांना ढकलून देत त्यांच्या गळ्यातील ४ तोळ्याचे गंठन हिसकावून घेतले. त्यावेळी साळुंखे यांच्या पत्नी घाबरुन घरात गेल्या त्या नंतर त्याने बाहेरुन कडी लावत पती-पत्नीला कोंडुन घेतलं. त्यानंतर त्याने पोल्ट्रीत असलेल्या १० ते १५ कोंबड्यासहीत अंदाजे १ लाख ३५ हजारांचे कोंबड्याचे खाद्य पिकउप मध्ये चोरुन नेले. अशी तक्रार साळुके यांनी केली आहे . आरोपींच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत . तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत .

Web Title: Farmer husband and wife beaten up, Rs 1 lakh 35 worth of chicken feed taken away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.