लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:54+5:302021-09-19T04:11:54+5:30
नीरा : शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत पुरंदर तालुक्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ...
नीरा : शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत पुरंदर तालुक्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या बाजरीसह इतर पिकांची शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागत आहे. दिवसभरात क्षणाला कडक उन्ह, तर क्षणात ढग दाटून येत आहेत. या लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांची तारेवरली कसरत सध्या सुरू आहे. त्यामुळे पहिली आळाशावरील ठेवलेल्या कणसांची छाटणी व नंतर पुन्हा कापणी केली जात आहे.
मागील आठवड्यात नीरा परिसरात दमदार पाऊस पडल्याने, आता मुसळधार पावसाने दोन-तीन दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी बाजरी पिकाच्या काढणीच्या लगबगीमध्ये आहेत. पिकाची काढणीची लगबग सुरू असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबासह स्वत:च शेतात राबत आहेत. मागील आठवड्यापासून दररोज दुपारपर्यंत कडक ऊन पड.ते दुपारनंतर पाऊस होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच बाजरी, सूर्यफूल, भुइमूग, मुग, मटकी, तूर, सोयाबीन आदी पिके काढणीला आल्याने व दररोज पाऊस पडत असल्याने हातातोंडाशी आलेला उभ्या पिकांचा घास, पाण्यामध्ये जातोय की काय, या चिंतेने शेतकरी ग्रासलेले आहेत.
मागील वर्षीही पावसाने बाजरीचे मोठे नुकसान झाले होते. चालू वर्षी बाजरीचे पीक चांगले आले आहे; परंतु परतीचा पाऊस मागील आठवड्यापासून होत असल्याने, बाजरीचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी बाजरी काढणीची घाई करत असून, दुपारनंतर येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांनी बाजरीची काढणी केली. त्या बाजरीला मागील दोन दिवसांपासून पावसाची उघडीप मिळाल्याने, चांगली उन्हाची ताप मिळाली असून, शेतातील उभ्या बाजरी पिकालाही सध्या पडत असलेल्या कडक उन्हाचा फायदा घेऊन राहिलेल्या शेतकरीवर्गाची बाजरी लवकरात लवकर काढणीला येईल, असा अंदाज कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथील शेतकरीवर्ग मांडत आहेत.
१८ नीरा
कर्नलवाडी येथील शेतकरी आळाशावरील ठेवलेल्या कणसांची छाटणी व नंतर पुन्हा कापणी करत आहेत.