शेतकऱ्यांनी एका दिवसात भरले ५६ लाखांचे थकीत बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:45+5:302021-02-16T04:11:45+5:30
जिल्ह्यामध्ये एका दिवसात थकीत कृषीपंपाची वीजबिले शेतकऱ्यांकडून भरून घेणारे मांडवगण फराटा येथील महावितरण कार्यालय एकमेव ठरले आहे, जेवढी थकीत ...
जिल्ह्यामध्ये एका दिवसात थकीत कृषीपंपाची वीजबिले शेतकऱ्यांकडून भरून घेणारे मांडवगण फराटा येथील महावितरण कार्यालय एकमेव ठरले आहे, जेवढी थकीत वीजबिले शेतकऱ्यांनी भरलेली आहेत, त्यातील ३३ टक्के रक्कम गावातील महावितरण कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. महावितरणाचे अधिकारी कर्मचारी गावोगावी सध्या वसुलीसाठी फिरत आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, शाखा अभियंता मतीन मुलाणी, लेखासहायक हेमंत रायते आदी जनमित्र उपस्थित होते.
शेतकऱ्यांना या कृषी योजनेचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कृषीपंपाची वीजबिले भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिल्याने व थकीत वीजबिल भरल्याने शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
--
१५रांजणगाव सांडस वीजबिल
फोटो ओळी : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांचा सत्कार करताना अधिकारी.